एकेकाळी अंडरवर्ल्ड व बॉलीवूडचे संबंध होते, हे काही लपून राहिलेलं नाही. मग ते सलमान खानचे व्हायरल झालेले फोटो असोत किंवा अभिनेत्री मंदाकिनी व दाऊदचे अफेअर असो. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना दाऊदसाठी नाचली होती, अशा चर्चा आता होत आहेत. दाऊद इब्राहिमच्या पार्टीत ट्विंकल खन्ना सहभागी झाली होती आणि तिने तिथे डान्स केला होता, असं म्हटलं जात होतं. याबाबत ट्विंकलने मौन सोडलं आहे.

ट्विंकल खन्नाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी लिहिलेल्या कॉलममध्ये याबाबत तिची प्रतिक्रिया लिहिली आहे.”मी एका टीव्ही न्यूज चॅनलवर माझ्या नावाचं टिकर पाहिलंय, ज्यात लिहिलं होतं की मी दाऊदसाठी डान्स केला होता. अनेक गाण्यांवर मी वेड्यासारखे नाचले होते. पण खरं सांगायचं झाल्यास माझ्या मुलांनाही असं वाटतं की माझा डान्स पाहणं डब्ल्यूडब्ल्यूएफचा सामना पाहण्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे दाऊदने माझ्यापेक्षा चांगल्या डान्सर निवडल्या असतील, हे वृत्तवाहिन्यांना कळायला हवं होतं, पण हे फेक न्यूजचं जग आहे.”

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

ट्विंकल खन्नाने पुढे लिहिलं, “आपण फेरफार केलेल्या अनेक खोट्या बातम्या पाहिल्या आहेत. ज्यामध्ये कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान एक कुस्तीपटू हसतानाचा फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला होता. अगदी त्या फोटोपासून ते करोना व्हायरसपर्यंत असंख्य फेक न्यूज आपण पाहिल्या आहेत.”

चाहती अचानक स्टेजवर आली, मिठी मारली, हाताचं चुंबन घेतलं अन्…; प्रसिद्ध गायकाने केलं असं काही की… पाहा VIDEO

यापूर्वी अक्षय कुमारने आपल्या एका मुलाखतीत दाऊद इब्राहिमच्या पार्ट्यांमध्ये ट्विंकलने हजेरी लावल्याच्या बातम्या या फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं. २०१० मध्ये त्याने यावर प्रतिक्रिया दिली होती. “मला माहित नाही की अशा बातम्या कुठून येतात. या बातम्यांमध्ये तथ्य असते तर माझ्या घरावर आतापर्यंत छापेमारी झाली असती. ही बातमी समोर आल्यानंतर एकही पोलीस हवालदार माझ्या घरी आला नाही. पण या बातमीमुळे मला त्रास झाला,” असं अक्षय म्हणाला होता.