Salman Khan on Aishwarya Rai Abhishek Bachchan : सलमान खान अविवाहित असला तरी त्याचे अनेक अभिनेत्रींबरोबर प्रेमसंबंध होते. त्यापैकी सलमानचं ऐश्वर्या रायबरोबरचं नातं सर्वाधिक चर्चेत राहिलं होतं. सलमान व ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं. नंतर काही वर्षांनी तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. अभिषेक व ऐश्वर्याचं लग्न झाल्यावर सलमान खानला तिच्याबद्दल विचारण्यात आलं होतं.

अभिषेक बच्चनशी लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या राय सलमान खानबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. ऐश्वर्या व सलमान यांच्या ब्रेकअपला दोन दशकांहून जास्त काळ उलटला असला तरी आजही त्यांच्याबद्दल चर्चा होते. सलमान व ऐश्वर्या सोबत असताना सलमान तिला सेटवर भेटायला जायचा, असा खुलासा नुकताच अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी केला. दोघांचं प्रेम सर्वश्रूत होतं, पण त्यांचं ब्रेकअप झालं आणि ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेकशी लग्न केलं. तिच्या लग्नानंतर एकदा सलमानला तिच्या व अभिषेकच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर सलमान काय म्हणाला होता, ते पाहुयात.

एकेकाळी प्रेक्षकांची सर्वात आवडती ऑनस्क्रीन जोडी असलेले सलमान खान व ऐश्वर्या ब्रेकअपनंतर कधीच एकमेकांना भेटले नाहीत. पण सलमान बऱ्याचदा अभिषेकला भेटतो, त्याचं अभिषेक व बच्चन कुटुंबाशी चांगलं नातं आहे. सलमानने ऐश्वर्या व अभिषेकच्या लग्नानंतर तिच्याशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.

माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा…

सलमान खानने २०१० मध्ये रजत शर्मा यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ‘सलमान खान ऐश्वर्या रायच्या घरी गेला, काच फोडली आणि हाताला जखम करून घेतली, अशा बातम्या आल्या होत्या,’ असं रजत शर्मा यांनी सलमानला विचारलं. त्यावर सलमान म्हणाला, “मी काय बोलू सर? वैयक्तिक आयुष्य खासगीच राहायला हवं असं माझं मत आहे. आता मी स्वतःचा बचाव केला तर त्याचा अर्थ असा होईल की कोणीतरी माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होतं, हे मी नाकारतोय. त्यामुळे शांत राहणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आता इतकी वर्षे लोटली आहेत. ती एका छान कुटुंबात सुखी वैवाहिक आयुष्य जगतेय आणि मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे.”

सलमान पुढे थेट ऐश्वर्याच्या पतीचं नाव घेत म्हणालेला, “अभिषेक खूप चांगला माणूस आहे. तुमचं एकमेकांबरोबरचं नातं संपल्यानंतर त्या व्यक्तीने दुःखी राहावं, असं कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटत नाही. आपल्याशिवाय समोरच्या व्यक्तीने आनंदी राहावं, असंच कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटतं.”

सलमानचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. दरम्यान, सलमान खान व ऐश्वर्या राय यांच्यात ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी जवळीक वाढली. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ऐश्वर्या सलमानला सर्वात सेक्सी पुरुष म्हणायची. पण नंतर विवेक ओबेरॉयची ऐश्वर्याच्या आयुष्यात एंट्री झाली आणि सलमान ऐश्वर्याचं नातं संपलं. पण ते नातंही टिकलं नाही. मग ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या जोडप्याला आराध्या नावाची मुलगी आहे.