Zeenat Aman on Satyam shivam Sundarm 2 : सत्यम शिवम सुंदरम हा राज कपूर दिग्दर्शित एक अजरामर चित्रपट आहे. या सिनेमात झीनत अमान आणि शशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाला इतकी वर्षे लोटली आहेत तरीही त्यातली गाणी, त्या सिनेमाची कथा लोकांच्या लक्षात आहे. या सिनेमात रुपा ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या झीनत अमान यांनी या सिनेमाच्या सिक्वलवर भाष्य केलं आहे. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या झीनत अमान?

सत्यम शिवम सुंदरम या सिनेमा सिक्वल आला तर रुपाच्या भूमिकेत कोण शोभून दिसेल? असं करणने झीनत अमान यांना विचारलं. त्यानंतर झीनत अमान म्हणाल्या, “सत्यम शिवम सुंदरमचा सिक्वल आला तर त्यातलं रुपा हे पात्र दीपिका पदुकोणने साकारलं पाहिजे. दीपिका त्या भूमिकेत अगदी शोभून दिसेल.” असं झीनत अमान म्हणाल्या. तसंच करणने झीनत अमान यांना बायोपिकबाबतही प्रश्न विचारला. तुमच्या आयुष्यावर बायोपिक आला तर त्यात कुठल्या अभिनेत्रीला पाहण्यास आवडेल? असं विचारलं असता झीनत अमान यांनी प्रियंका चोप्राचं नाव घेतलं.

सत्यम शिवम सुंदरम हा राज कपूर यांचा सिनेमा

सत्यम शिवम सुंदरम २२ मार्च १९७८ ला प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती राज कपूर यांनी केली होती. या सिनेमात झीनत अमान आणि शशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. झीनत अमान यांनी रुपा हे गावातल्या मुलीचे पात्र साकारले होते. या सिनेमात काही बोल्ड दृश्यंही होती. त्यामुळे हा सिनेमा खूप गाजला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतली सोशिक आणि पठडीतल्या अभिनेत्रीची प्रतिमा मोडण्यात झीनत अमान यांचा मोठा वाटा आहे. झीनत अमान यांनी अभिनयाबरोबरच बोल्डनेसचा तडकाही दिला. त्यामुळे अभिनेत्री झीनत अमान यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

हे पण वाचा- झीनत अमान : हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं ‘बोल्ड’ स्वप्न!

राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी १०० मुलींची ऑडिशन घेतली होती. मात्र त्यातून कुणीही निवडलं गेलं नाही. तसंच हेमा मालिनी यांनाही या भूमिकेबाबत विचारणा झाली होती. मात्र त्यांनीही ही भूमिका करण्यास नकार दिला.‘सत्यम शिवम सुंदरम’ हा तिचा पहिला सिनेमा नव्हता. मात्र यातला तिचा बोल्डनेस प्रेक्षकांची झोप उडवणारा ठरला. जेव्हा झीनत अमान यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी तो मेकअप केला आणि त्या कॅमेराला सामोऱ्या गेल्या. त्यांनी अर्धी लढाई तिथेच जिंकली होती आणि नंतर त्या निवडल्या गेल्याच. अर्धा चेहरा जळालेल्या मुलीचं हे पात्र होतं जे लोकांच्या आजही स्मरणात आहे. सत्यम शिवम सुंदरम सिनेमा सुपरहिट ठरला आणि झीनत अमान स्टार झाल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zeenat aman says deepika would be perfect choice for satyam shivam sundaram sequel scj