मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. गेल्या काही वर्षांमध्ये सईने मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज २५ जून रोजी सई ताम्हणकरचा ३७ वा वाढदिवस असून याचे सेलिब्रेशन करण्यासाठी अभिनेत्री बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर स्पेन फिरायला गेली आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने मागितली चाहत्यांची माफी; वाढदिवसानंतर शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

अनिश जोगने सई ताम्हणकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये अनिश लिहितो की, “माझ्या ड्रॅगन क्वीनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तू माझ्या हृदयाची आणि संपूर्ण जगाची राणी आहेस. तुला या जगातील सगळा आनंद मिळो…लव्ह यू Dracarys!!!” सईचे स्पेन दौऱ्याचे सर्व फोटो एकत्र करून अनिशने तिच्या वाढदिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सई रडताना, हसताना, स्पेनमधील विविध ठिकाणांना भेट देताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने “फिर ले आया दिल…” हे रोमॅंटिक गाणे अनिशने जोडले आहे.

हेही वाचा : अमिताभ बच्चन आणि प्रभासच्या बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात साऊथच्या मेगास्टारची एन्ट्री! बिग बी पोस्ट शेअर करीत म्हणाले…

अनिशने शेअर केलेल्या व्हिडीओवर सईच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट करीत अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे. दरम्यान, सई ताम्हणकर आणि अनिश जोग एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे. आता भविष्यात त्यांचे आणखी चित्रपट येणार असल्याचे म्हटले जात आहे.