‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा जिजा नावाच्या चिमुकल्या मुलीभोवती फिरते. हे पात्र बालकलाकार मायरा वायकुळने साकारलं आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी मायरा भावुक झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर मायराचा भावुक झालेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे मायराने सुंदर पैठणी पॅटनमधील ड्रेस घातला आहे. यावर साजेशी हेअरस्टाइल आणि कपाळी सुंदर टिकली लावली आहे. स्पेशल स्क्रीनिंगमध्ये शेवटी सर्वजण तिचं कौतुक करतात. त्यावेळी दिग्दर्शक संकेत माने यांच्या शेजारी ती उभी असून अचानाक भावुक होते. आपल्या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मायराच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. ती रडत असताना संकेत माने तिला जवळ घेतात.

मायराचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सुंदर चेहऱ्यावर डोळ्यांतले अश्रू यायला नको”, असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे.स्वानंदी टिकेकरने घेतलं नवीन घर! पतीसह फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, दाखवली नव्या घराची झलक

‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात जिजाची तिच्या बाबांना भेटण्यासाठीची ओढ दाखवण्यात आली आहे. यामध्ये मायरा वायकुळने आपल्या अभिनयाने जिजा या पात्राला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मायरा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशच्या कामात व्यस्त आहे. तिने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. तसेच शुंटिगदरम्यानचे काही भन्नाट आणि गमतीशीर किस्सेसुद्धा सांगितले आहेत.

दरम्यान, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाच्या ग्रॅन्ड प्रीमियरला मायरा तिचं संपूर्ण कुटुंब आलं होतं. यामध्ये मायराचा चिमुकला भाऊसुद्धा आला होता. भावाला पाहून ती लगेचच त्याच्या जवळ गेली आणि त्याला कुशीत घेतलं. तिचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाच्या ग्रॅन्ड प्रीमियरला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. स्नेहा वाघ, प्रथमेश परब आणि त्याची बायको क्षितिजा घोसाळकर, सुप्रिया पाठारे, मिलिंग गवळी, वर्षा उसगांवकर, महेश मांजरेकर, ऋता दुर्गुळे असे अनेक कलाकार उपस्थित होते. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटामध्ये मायराबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, कल्याणी मुळ्ये, प्रथमेश परब, सविता मालपेकर, मंगेश देसाई, कमलेश सावंत या कलाकरांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child actress myra vaikul emotional at the special screening of mukkam post devachan ghar video viral on social media rsj