रजनीकांतनंतर आता चिरंजीवी यांची लेक श्रीजा आणि अभिनेता कल्याण घेणार घटस्फोट?

श्रीजाने सोशल मीडियावर केलेल्या बदलामुळे ही चर्चा सुरु झाली आहे.

Chiranjeevi's daughter sreeja, sreeja divorce with kalyan dhev,
श्रीजाने सोशल मीडियावर केलेल्या बदलामुळे ही चर्चा सुरु झाली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांची लेक श्रीजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे नाव बदलून श्रीजा कोनिडेला केले आहे. त्यामुळे त्या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कल्याण देव हा सुपर माची या चित्रपटात शेवटी दिसला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी त्याला चिरंजीवी किंवा त्याच्या कुटुंबाकडून सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारे पाठिंबा मिळाला नाही.

२००७ मध्ये श्रीजाने सॉफ्टवेअर इंजिनियर सिरिश भारद्वाजशी लग्न केलं म्हणून ती चर्चेत आली होती. २०११ मध्ये सासरच्यांनी हुंडा मागितल्याचा दावा करत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तिचा पूर्वाश्रमीचा पती आता भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे. २०१६ मध्ये तिने कल्याण देव्हशी लग्न केले. कल्याण हा एक लोकप्रिय अभिनेता आणि प्रसिद्ध व्यावसायिक कॅप्टन किशन यांचा मुलगा आहे. त्यांच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. चिरंजीवीच्या कुटुंबाने किंवा कल्याणच्या कुटुंबाने ते विभक्त होणार असल्याच्या बातमीला अजुन तरी दुजोरा दिलेला नाही.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

आणखी वाचा : ‘पुष्पा’मुळे लागला जॅकपॉट; समांथाला मिळाली बॉलिवूडमधल्या ३ चित्रपटांची ऑफर

श्रीजा दोन मुलींची आई असून निव्रती आणि नविष्का अशी तिच्या मुलींची नावं आहेत. दरम्यान, चिरंजीवी यांनी नुकतीच मुख्यमंत्री वायएस जगन रेड्डी यांची भेटी घेतली. सध्या चिरंजीवी आचार्या या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. त्यात आता श्रीजा आणि कल्याणच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर आता चिरंजीवी यांचे चाहते ही खोटी बातमी आहे असे बोलतील अशी आशा करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chiranjeevi s daughter sreeja headed for divorce with actor husband kalyan dhev know more dcp

Next Story
Zombivli Trailer : डोंबिवलीत झोंबींचा थरार, अमेय वाघच्या ‘झोंबिवली’चा ट्रेलर पाहिलात का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी