सध्या राज्यात फक्त दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवाजी पार्क या ठिकाणी शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळाले. विविध मुद्दयांवरुन केलेली खोचक टीका, टोलेबाजी यामुळे हे दोन्ही दसरा मेळावे फारच गाजले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अनेक कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शरद पोंक्षेंनी भाषण करतेवेळी रामायण आणि महाभारतात काही दाखलेही दिले. “रामायणात रावणाचा भाऊ बिभीषणाने भगवान श्री राम यांच्या बाजूने युद्ध लढले होते. श्रीरामाने बिभीषणाला आपल्या बाजूने लढायचे निमंत्रण दिले नव्हते. पण, बिभीषणाला माहित होते की, आपल्याला सत्याची, धर्माचीच साथ द्यावी लागणार आहे आणि रावण अधर्माच्या बाजूने आहे.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, भाजपाच्या राम कदमांचा इशारा

म्हणूनच, तो रावणाविरोधात आणि श्रीरामांच्या बरोबरीने लढला. पण, त्याचा कधीच कोणी गद्दार म्हणून उल्लेख केला नाही. महाभारतातही कर्णाला हरवणे अशक्य होते. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला निशस्त्र कर्णावर बाण मारण्यास सांगितले. पण, त्यालाही कोणी पाठीत खंजीर खुपसले असे म्हटले नाही.” असे शरद पोंक्षे म्हणाले.

“आज एकनाथ शिंदे हे श्रीकृष्णाची भूमिका बजावत आहेत. ज्या बाळासाहेबांनी म्हटले होते, माझा मुख्यमंत्री झाल्यावर मशिदीवरचे भोंगे खाली उतरवेन, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करेन, त्यांच्या मुलाने काय केले, सतत आमच्या देवांचा अपमान करणाऱ्या नेत्यांसोबत बसले. एकनाथ शिंदेंनी उचलले पाऊल किती योग्य होते, ते या मैदानावर आलेला जनसागर पाहून समजतं. सत्य आणि नितीमत्तेसाठी जे जे योग्य आहे ते एकनाथ शिंदे करत आहेत”, असेही शरद पोंक्षे म्हणाले.
आणखी वाचा : आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सी ग्लो, डोहाळे जेवणाचे फोटो समोर

दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला अभिनेता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक- लेखक प्रविण तरडेही उपस्थित होते. एकनाथ शिंदेंचे व्यासपीठावर आगमन होताच प्रसाद ओक आणि प्रवीण तरडेंनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना समर्थन दिले. यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच याची सर्वत्र चर्चाही रंगली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde dasara melawa sharad ponkshe speech criticize uddhav thackeray nrp
First published on: 06-10-2022 at 12:51 IST