“रणवीर बेडवर…”, दीपिका पदुकोणने उघड केले बेडरुम सिक्रेट

तिचे हे उत्तर ऐकून रणवीर थक्क झाला.

बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. नुकतंच एका मुलाखतीत दीपिकाने बेडरुम सिक्रेट शेअर केले आहे. यावेळी तिने रणवीरबाबत आश्चर्यकारक खुलासाही केला आहे.

दीपिका आणि रणवीर हे दोघेही एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. या कार्यक्रमात दीपिकाला रणवीरची स्टाईल आणि ब्युटी सिक्रेट्सबद्दल विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिकाने तिचे बेडरुम सिक्रेट उघड केले. तिचे हे उत्तर ऐकून रणवीर थक्क झाला.

रणवीरच्या स्टाईल आणि ब्युटीबद्दल दीपिकाला विचारले असता ती म्हणाली, ‘रणवीर हा बराच वेळा शॉवर घेतो. तसेच तो टॉयलेटमध्ये बराच वेळ असतो. विशेष म्हणजे तो बेडवरही बराच वेळ घेतो.’ तिचे हे उत्तर ऐकताच सर्वजण थक्क झाले. दीपिका नक्की काय बोलली असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर दुसरीकडे रणवीर हा दीपिकाच्या चेहऱ्याकडे बघत बसला होता.

यानंतर दीपिकाने फार स्मार्टरित्या तिच्या या वाक्यावर स्पष्टीकरण दिले. ‘रणवीर बेडवर झोपायला ही बराच वेळ घेतो’, असे ती म्हणाली. दरम्यान तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शाहरुख खानमुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे दीपिकाने निवडला ‘पठाण’, मुलाखतीदरम्यान केला खुलासा

दरम्यान दीपिका पदुकोण ‘गहराइयां’, ‘फायटर’ आणि ‘पठाण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंह हा जयेशभाई जोरदार आणि ‘सर्कस’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepika padukone shares ranveer singh bedroom secrets he takes longer in bed nrp

Next Story
पाकिस्तानी पीएमला पाठवण्यात आला होता रवीना टंडनच्या नावाचा बॉम्ब, अभिनेत्रीने दिली आता प्रतिक्रिया
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी