सध्या इंटरनेटवर दिया मिर्झाची चांगलीच चर्चा होत आहे. या चर्चेचं कारणही तसंच आहे. दिया लवकरच आई होणार आहे. ही गोड बातमी तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
दिया सध्या आपल्या परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिथलाच एक फोटो तिने शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचं ती कॅप्शनमध्ये म्हणत आहे. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे.
दिया तिचा पती वैभव रेखी आणि तिची सावत्र मुलगी समायरा यांच्यासोबत मालदिवमध्ये आहे. या सुट्टीचे फोटो ती कायम सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. दियाने नुकतंच वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. तिचं लग्नही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलं. या लग्नात तिने जास्तीत जास्त विघटनशील आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर केला होता. तसंच या लग्नाचे पौरोहित्य एका महिलेने केले.
तिने २०१४ मध्ये साहिल सांघा याच्याशी विवाह केला होता मात्र २०१९ साली ते विभक्त झाले. वैभवसोबत तिने दुसरा विवाह केला.