दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती. पण त्या आधी समांथा ही तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरतरं समांथा आणि नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. त्यानंतर अचानक समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नागा चैतन्यचं आडनाव काढून टाकलं. एवढचं काय तर त्या दोघांनी एक दिवस सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट झाल्याचे सांगितले. त्यानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे, समांथाने तिची लग्नाची साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केली.

आणखी वाचा : ‘झुंड’ पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर येताच अनुराग कश्यपने नागराज मंजुळेंना मारली मिठी; म्हणाला “मी आतापर्यंत…”

आणखी वाचा : “आरव कोणाला सांगत नाही की तो माझा मुलगा आहे कारण…”, अक्षय कुमारने केला होता खुलासा

समांथाने तिची लग्नाची साडी नागा चैतन्यला परत केली आहे. ती साडी डग्गुबती कुटुंबातील असल्याने समांथाने ती परत देण्याचा निर्णय घेतला. समंथाची साडी चित्रपट निर्माते डी रामनायडू यांच्या पत्नी आणि नागा चैतन्यची आजी डी राजेश्वरी यांनी त्यांच्या लग्नात परिधान केली होती. समांथाने तिचं साडी तिच्या लग्नात परिधान केली होती. समांथाला नागा चैतन्य किंवा त्याच्या कुटुंबाशी संबंधित कोणतीही गोष्ट स्वत: जवळ ठेवण्याची इच्छा नाही आणि म्हणून तिने ती साडी परत केली, असे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : राणी मुखर्जी सोशल मीडियावर का नाही? बहिण काजोलने दिले नेटकऱ्याच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर

समांथाला घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाने २०० कोटी रुपयांची पोटगी देऊ केली होती. पण, समांथाने पोटगी घेण्यास नकार दिला आणि नागा किंवा त्याच्या कुटुंबाकडून एक रुपयाही घ्यायचा नाही असं सांगितल. दरम्यान, समांथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये गोव्यात लग्न केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did samantha return her wedding saree to naga chaitanya s family after separation dcp