scorecardresearch

“आरव कोणाला सांगत नाही की तो माझा मुलगा आहे कारण…”, अक्षय कुमारने केला होता खुलासा

अक्षय कुमारने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

akshay kumar, aarav, twinkle khanna,
अक्षय कुमारने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांची दोन्ही मुलं लाइम लाईटपासून लांब असतात. अक्षयच्या मोठ्या मुलाच नाव हे आरव आहे. आरव हा नेहमीच पॅपाराझी पासून लांब असला, तरी देखील तो लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. दरम्यान, अक्षयने एका मुलाखतीत आरव कोणाला सांगत नाही की तो माझा मुलगा आहे असे सांगितले.

अक्षयने काही दिवसांपूर्वी बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तो म्हणाला, “माझा मुलगा खूप वेगळा आहे. आरव कोणाला सांगत नाही की तो माझा मुलगा आहे. तो लाईमलाइटपासून लांब राहतो. त्याला स्वत: ची ओळख निर्माण करायची आहे. त्याच्या या निर्णयाला मी समजू शकतो. त्यामुळे त्याला जसं पाहिजे तसं मी राहू देतो.”

आणखी वाचा : जिनिलिया माहेरी जाणार ऐकताच, रितेश देशमुखने गायलं हे गाणं; Video पाहून हसू आवरणार नाही

आणखी वाचा : तैमूरने वडील सैफ अली खानवर उचलला हात, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अमीर बाप की…”

पुढे त्याच्या वडिलांविषयी बोलताना अक्षय म्हणाला, “माझे वडील माझी प्रेरणा होते आणि अजूनही मी त्यांच्याचं नियमांचे पालन करतो. मला आशा आहे की माझा मुलगा देखील तसचं करेल.”

आणखी वाचा : “नाटकी कलाकारांची झुंडशाही…”, मराठी कलाकारांना महेश टिळेकरांचा टोला

अक्षयने अलीकडेच त्याच्या ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. हा चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar says aarav does not want to tell anyone he is my son dcp