मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकचे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेले ‘धर्मवीर’ आणि ‘चंद्रमुखी’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर यशस्वी कामगिरी केली. या चित्रपटांच्या यशानंतर प्रसाद ओक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून त्याचा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद ओकच्या नवीन चित्रपटाचं नाव ‘सुटका’ असं आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी आणि लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता ओंकार राऊतही या चित्रपटात झळकणार आहे. स्वप्निल जोशीने चित्रपटाचं पोस्टर शेअर करत हा सुखद धक्का चाहत्यांना दिला आहे.

हेही वाचा >> विकी-कतरिना पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर; शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल

“Period films मधून होणार प्रसाद ओकची ‘सुटका’. Lovey-dovey image मधून होणार प्रार्थना बेहेरेची ‘सुटका’.  आणि LOVE STORIES मधून होणार स्वप्नील जोशीची ‘सुटका’. नवं काय? What next ? अशा प्रश्नांमधून होणार आमच्या सगळ्यांची ‘सुटका’”, असं कॅप्शन स्वप्निलने पोस्टला दिलं आहे.

हेही पाहा >> Photos : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ, कमेंट करत म्हणाले “तू तर हुबेहुब…”

प्रसाद ओक दिग्दर्शन करत असलेल्या ‘सुटका’ या चित्रपटाचं लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. तर परितोष पेंटर, राजेश मोहंती यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या नव्या चित्रपटासाठी पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद ओक सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे. तर स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ आणि प्रार्थना बेहेरे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director prasad oak new movie sutka actor swapnil joshi and actress prarthana behere to play lead role kak