सोशल मीडिया इन्फ्लुएंअर आणि ‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवाल कायम चर्चेत असते. वरुण सूदबरोबर ब्रेकअप केल्यानंतर दिव्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान, या सगळ्यावर आता दिव्या अग्ररवालने खुलासा केला आहे. दिव्याने अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलच्या कार्यक्रमात हजेरी लावत वरुण सूदबरोबर ब्रेकअप का केलं? याचे कारण सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शुबमन गिलबरोबर रोमॅंटिक फोटो शेअर करणारी ‘ती’ मुलगी कोण? नेटकरी म्हणाले, “सारा भाभी…”

दिव्या अग्रवाल आणि तिचा होणारा नवरा अपूर्व पाडगावकर दोघेही अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलच्या शोमध्ये आले होते. यावेळी अपूर्व म्हणाला, “दिव्या इंडस्ट्रीचा भाग नव्हती तेव्हापासून मी तिला ओळखतो. दिव्याने नुकतीच ‘मिस नवी मुंबई’ ही स्पर्धा जिंकली होती तेव्हा मी पहिल्यांदाच तिला पाहिले होते. ती मुळातच खूप आत्मविश्वास असणारी मुलगी आहे. आयुष्यात आम्ही दोघांनीही अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.”

हेही वाचा : ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’नंतर लवकरच येणार ‘रामशेज’; ऐतिहासिक चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

पुढे दिव्या म्हणाली, “मी फेसबुकवर अपूर्वला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि नंबर एक्सचेंज केले. मला अपूर्व एवढा आवडला होता की, मला तेव्हाच त्याच्याशी लग्न करायचे होते पण अपूर्वला घाईत काहीही करायचे नव्हते. त्यामुळे आमच्या दोघांमधील बोलणे बंद झाले.” पुढे वरुणबरोबरच्या ब्रेकअपविषयी सांगताना दिव्या म्हणाली, “माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर मला खूप एकटेपणा जाणवत होता. तेव्हा मला वाटले की, माझे आणि वरुणचे नाते व्यवस्थित नाहीये. त्यानंतर काही दिवसांनी १४ फेब्रुवारीला एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात मी अपूर्वला पुन्हा भेटले. तेव्हा आम्हाला जाणवले आम्ही किती मूर्ख आहोत, आज आम्ही त्यांच्या जागी असू शकलो असतो. अपूर्वने मला त्याच्या कुटुंबियांना भेटायला बोलावले आणि माझ्या मनात वरुणबरोबच्या नात्याबाबत संभ्रम निर्माण झाला.”

हेही वाचा : Video : “थोडीसी जो पी ली है…” आमिर खानच्या घरी रंगली कपिल शर्माची मैफिल, पाहा व्हिडीओ

दिव्याने पुढे सांगितले, “वरुणबरोबर असताना एकटेपणा जाणवत होता याउलट अपूर्व जवळचा वाटत होता. तेव्हाच मी वरुणला थेट सांगितले की, ‘आपल्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या मनात संभ्रम निर्माण झालाय.’ अचानक ब्रेकअपचा निर्णय घेऊन मी वरुणला दुखावले होते यामुळे मला प्रचंड त्रास होत होता, माझी चूक असल्याने मला वाईट होत होते. यानंतर एकदा मी वरुणची अपूर्वशी ओळख करून दिली आता हळूहळू मी या सगळ्यातून बाहेर पडतेय.”

दरम्यान, इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून दिव्याने वरुणबरोबर ब्रेकअप झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती. ब्रेकअपनंतर काही महिन्यांनी डिसेंबरमध्ये दिव्याने अपूर्वबरोबर साखरपुडा केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya agarwal breaks her silence on break up with varun sood sva 00