Entertainment News Today 7 August 2025 : ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. या शोच्या नव्या पर्वात कोणते सेलिब्रिटी झळकणार, याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशातच ‘ये है मोहब्बतें’मध्ये इशिता भल्ला आणि ‘बनू मैं तेरी दुल्हन’ मध्ये विद्या साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी या पर्वात दिसणार, अशी चर्चा आहे. इतकंच नाही तर तिचा एक्स बॉयफ्रेंड शरद मल्होत्राशीही बिग बॉसच्या निर्मात्यांनी संपर्क साधला आहे.
‘बिग बॉस तक’ च्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस १९’ साठी दिव्यांका त्रिपाठी दहिया आणि शरद मल्होत्राशी संपर्क साधण्यात आला आहे. १९ वर्षांपूर्वी दिव्यांका व शरद यांनी एकत्र मालिका केली आणि ते प्रेमात पडले. ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. दोघांचं नातं वाईट पद्धतीने संपलं होतं, त्यामुळे हे बिग बॉसमध्ये झळकणार अशा चर्चा रंगल्यावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, दिव्यांका त्रिपाठीने बिग बॉसमध्ये सहभागी होत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मनोरंजन न्यूज अपडेट : Entertainment News Today
“त्यांच्या पायाची धूळ…”, लोकप्रिय अभिनेत्याने केली शाहरुख खानची कमल हासन यांच्याबरोबर तुलना; टीक करीत म्हणाले…
चित्रपट ठरले फ्लॉप, बॉलीवूडपासून दुरावली; अभिनेत्रीने स्वतःचं नावच बदललं, म्हणाली, “मी हा निर्णय…”
बिग बॉस 19 अपडेट्स (फोटो – इन्स्टाग्राम)