आज ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच अभिनेत्री नीतू सिंग यांनीही आपल्या एकेकाळच्या या सहकलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत तिने आपल्या वडिलांसाठी एक इमोशनल असं कॅप्शनही दिलं आहे. यात अभिनेते जितेंद्र आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. यात त्यांची पत्नी शोभा, मुलगी एकता, नातवंडं रवी आणि अक्षया हे दिसत आहेत. काही फोटोंमध्ये प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि अभिनेते, दिग्दर्शक राकेश रोशनही दिसत आहेत. या फोटोत जितेंद्र यांचा मुलगा, अभिनेता तुषार कपूर मात्र दिसत नाही.

हा व्हिडिओ शेअऱ करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये एकताने लिहिलं आहे की कश्या पद्धतीने जितेंद्र यांनी कायम तिच्या वाढीला, विकासाला चालना दिली आणि जेव्हा तिने निर्माती होण्याचं ठरवलं तेव्हा कशाप्रकारे तिला पाठिंबा दिला. या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा! तुम्ही माझ्या पंखांना बळ दिलंत, माझ्या वाढीला, विकासाला चालना दिली आणि जेव्हा मी निर्माती होण्याचं ठरवलं तेव्हा मला पाठिंबा दिला. स्वीकारण्यातच खरं प्रेम आहे हे तुम्ही मला शिकवलंत. लव्ह यू!”

जितेंद्र यांच्या एकेकाळच्या सहकलाकार अभिनेत्री नीतू सिंग यांनीही एकताच्या या पोस्टवर कमेंट करत जितेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी “हॅप्पी बर्थडे भप्पा” अशी कमेंट केली आहे. नीतू आणि जितेंद्र यांनी ‘धरम वीर’, ‘प्रियतमा’, ‘चोरनी’, ‘जानी दुश्मन’, ‘द बर्निंग ट्रेन’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. नीतू यांची मुलगी रिधीमानेही कमेंट करत जितेंद्र यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याचसोबत छोट्या पडद्यावरच्या अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत जितेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिना खान, गौतमी कपूर, सुप्रिया शुक्ला या अभिनेत्रींनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

जितेंद्र यांचा मुलगा, अभिनेता तुषार कपूरने मात्र अद्याप अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर केलेली नाही.

जितेंद्र यांनी बॉलिवूडला अनेक हि़ट चित्रपट दिले. त्यांनी गेल्या वर्षी अल्ट बालाजीच्या बारिश सिझन २ या वेबसीरीजमधून डिजीटल विश्वातही पदार्पण केलं. जितेंद्र हे एकता कपूरच्या अल्ट एंटरटेनमेंट, बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्स या संस्थांचे चेअरमन आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoor wishes happy birthday to her father jeetendra vsk