Abeer Gulaal Release in India : फवाद खान आणि वाणी कपूरचा ‘अबीर गुलाल’ सिनेमा आता भारतातही रिलीज होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजला भारतात बंदी होती. एप्रिलमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलून, त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले. त्यातच तेथील कलाकारांचे चित्रपट भारतात रिलीज होणार नाहीत, असाही निर्णय घेतला गेला होता. आता ‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित करण्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
‘अबीर गुलाल’ चित्रपट काल (१२ सप्टेंबर) जगभरात प्रदर्शित झाला होता; मात्र तो भारतात प्रदर्शित झालेला नाही. ‘बॉलीवूड हंगामा’ रिपोर्टनुसार, फवाद आणि वाणी कपूरचा हा सिनेमा २६ सप्टेंबर रोजी भारतातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जगभरातील रिलीजच्या दोन आठवड्यांनंतर तो भारतात रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘अबीर गुलाल’ हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. फवाद खानसाठी हा एक मोठा चित्रपट होता कारण- त्याने आठ वर्षांनी या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले होते. तो शेवटचा २०१६ मध्ये आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात दिसला होता.
‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
सर्व अडचणी असूनही ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ‘अबीर गुलाल’ आता २६ सप्टेंबर रोजी भारतातही रिलीज होत आहे. ‘अबीर गुलाल’ सिनेमाची निर्मिती विवेक अग्रवाल, अवंतिका हरी, राकेश सिप्पी यांनी केली आहे. अमित त्रिवेदीने चित्रपटासाठी संगीत दिले आहे; आरती बागडी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या वर्षीच सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे शूट लंडनमध्ये झाले होते.
बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाणीला फार मोठा त्याग करावा लागला. वडिलांच्या विरोधात वाणीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अभिनय विश्वात ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्रीच्या आईने साथ दिली; पण वडिलांचा मात्र विरोध होता. मॉडेलिंगपासून सुरुवात करीत वाणीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्रीने २००९ मध्ये छोट्या पडद्यापासून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्याला सुशांत सिंह राजपूत स्टारर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर वाणीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.