बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्नगाठ बांधली आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री गीता बसरा. गीता बसराने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवाग गोलंदाज हरभज सिंहसोबत संसार थाटला आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गीता आणि हरभजन लग्नबंधनात अडकले. 2015 ला दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या ६ वर्षानंतर गीताने हरभजन आणि तिच्या प्रेम कहाणीचे काही किस्से शेअर केले आहेत.
दिल दिया है’, ‘द ट्रेन’ आणि ‘सेकेंड हैंड हसबैंड’ अशआ सिनेमांमधून गीता झळकली आहे. बॉलिवूड बबलला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीता बसराने तिच्या लव्हस्टोरीचा खुलासा केलाय. ती म्हणाली, “द ट्रेन या माझ्या सिनेमाच्य़ा पोस्टरमध्ये पाहूनच हरभजनला मी आवडली होते. त्यानंतर हरभजनने माझ्याबद्दल विचारपूस करण्यास सुरूवात केली. ही मुलगी कोण आहे? कुठली आहे? हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. तर दुसरीकडे मी क्रिकेट पाहत नसल्याने मला हरभजन सिंह कोण आहे? काय आहे? याबद्दल काहीच कल्पना नव्हती.” असं गीता म्हणाली.
त्यानंतर गीता आणि हरभजनची ओळख झाली.. ते डेट करू लागले. आणि २९ ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांता विवाह झाला. तर २०१६ साला त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. त्यांच्या मुलीचं नाव हिनाया आहे. लंडनमध्ये हिनायाचा जन्म झाला. लवकरच गीता दुसऱ्यांदा आई होणार आहे.
इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत गीताने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी दिली होती. जुलैमध्ये ती आई होणार असं तिने या पोस्टमध्ये म्हंटलं होतं.