बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जिनिलिया नेहमी पती रितेश देशमुखसोबत मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसते. पण यावेळी जिनिलियाने अभिनेता शक्ती कपूर यांच्यासोबत व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलिया आणि शक्ति कपूर करीना कपूरच्या फेव्हिकॉल या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “क्राइम मास्टर गोगा सोबत मज्जा आली”, असे कॅप्शन जिनिलियाने दिले आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिनिलियाच्या या व्हिडीओवर रितेशने “तुझं सर्वात Best Reel, शक्ती सर खूप खूप प्रेम”, अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा : “…तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : ‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं

आणखी वाचा : “मुघलांसोबत, आपल्या राजांचाही इतिहास अभ्यासक्रमात असावा…”, अक्षय कुमारचे वक्तव्य चर्चेत

रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून मोठ्या मुलाचे नाव रियान आणि धाकट्याचे नाव राहिल आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh reel video with master goga shakti kapoor riteish deshmukh comment video viral dcp