बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून ही येतं. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. जिनिलिया ही नेहमीच इन्स्टाग्रामवरुन विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलासोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर आता जिनिलियाने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर तुफान कमेंट्स केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिलचा व्हिडीओ तयार केला आहे. “तू एवढी सुंदर दिसतेस, तर तुला परी म्हणू की सुंदरा…,” असा प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे. त्यावर ती “अरे ताई म्हण…ताई!” असे उत्तर देत जिनिलिया हसायला लागली. या व्हिडीओत जिनिलियाही फार क्यूट दिसत आहेत. यात तिचा नेहमी दिसणारा निरागस स्वभाव पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर फार मजेशीर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जिनिलियाने तिचा मोठा मुलगा रियानसोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. यात जिनिलिया व्हिडीओच्या सुरुवातीला “Hii Guys, ही मी आहे आणि हा… तू कोण आहेस रे?” असा प्रश्न विचारताना दिसते. जिनिलियाचा हा प्रश्न पाहून रियान दोन सेकंद गोंधळात पडतो. त्यावेळी त्याचे हावभाव फार सुंदर दिसत आहेत.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जेनेलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि रेहाल अशी दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh share another reels video viral on instagram nrp