बॉलिवूड अभिनेत्री काजोल आज ५ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करते आहे . काजोलने तिचा हा खास दिवस तिची बहीण तनिशा मुखर्जी आणि आई तनुजा मुखर्जीसोबत साजरा करत आहे. काजोल तिच्या इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असून वेळोवेळी फॅन्सना संपर्कात राहते. काजोलने तीच्या  इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती तनिशा बरोबर तिचा हा खास दिवस साजरा करताना दिसली आहे. काजोलने  एका मुलाखतीत तिच्या बर्थडे प्लॅन्स आणि तिच्या नवीन प्रोजेक्ट्स बद्दल तिच्या फॅन्सना माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाढदिवसा बद्दल बोलताना काजोल सांगते की तिला तिचा वाढदिवस खूप आवडतो आणि ती या दिवशी शक्यतो काम करत नाही. काजोलला तिच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करायला आवडतो. यावेळी ते शक्य नसल्याने ती काहीशी नाराज आहे.तिने ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ” जरी मला सगळ्यांना एकत्र भेटता येत नसले तरी मी त्यांना वेगवेगळ्या दिवशी भेटणार आहे. म्हणजे माझी व सगळ्यांची भेट होईल.”

काही दिवसंपासून काजोल लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या प्रोजेक्टवर काम करणार असल्याची चर्चा रंगत आहे. यावर यात काही तथ्य नसल्याचे तिने त्या मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली की, “मला त्यांच्याकडून काहीच ऑफर आली नाही…मी स्क्रिप्ट वाचते आहे…मी व्हर्चुअली बऱ्याच लोकांना भेटले आहे. मात्र अजून कोणत्याच गोष्टी फायनल झाल्या नाहीत.” अडीच वर्ष झाली, आता काजोल कामाला मिस करतं असल्याचे ही तिने त्या मुलाखतीत सांगितले आहे..

काजोलच्या कामा बाबत बोलायचे झाले तर ती नेटफ्लिक्सची फिल्म ‘देवी’ आणि ‘त्रिभंगा’ मध्ये झळकली होती. तसंच पती अजय देवगन सोबत ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ मध्ये त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday kajol devegan kajol devgan shares her birthday plans and new projects aad