अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुझान खानबरोबर अनेक वर्ष संसार केल्यानंतर दोघंही विभक्त झाले. पण आपल्या मुलांसाठी हे दोघं अजूनही एकत्र येतात. रिलेशनशिपमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत असणारा हृतिक आता अभिनेत्री सबा आझादला (Saba Azad) डेट करतोय. यापूर्वी हृतिक-सबाला बऱ्याचदा एकत्र पाहण्यात आलं होतं. दोघांचे फोटो, व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता हृतिक-सबा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Photos : वयाच्या ५०व्या वर्षी राहुल खन्नाचं न्यूड फोटोशूट, अभिनेत्याला पाहून मलायका अरोरा म्हणते…

बॉलिवूडलाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार, हृतिक-सबा लग्न करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत अद्यापही हृतिक-सबाने न बोलणंच पसंत केलं आहे. काही दिवसांपूर्वीच हृतिक-सबा लंडन येथे गेले होते. दोघांनी एकमेकांना एकत्रित वेळ दिला. तिथपासूनच हृतिक-सबाच्या लग्नाच्या चर्चांनी अधिक जोर धरला.

इतकंच नव्हे तर हृतिक बॉलिवूड पार्टी असो वा पुरस्कार सोहळा गर्लफ्रेंड सबाबरोबर तिथे हजेरी लावताना दिसतो. या दोघांचं नातं आता जगजाहिर झालं आहे. हृतिकने सबाबरोबर असलेल्या नात्याचा कधीच उघडपणे स्वीकार केला नसला तरी दोघांचं नातं हे कोणापासून लपून राहिलेलं नाही.

आणखी वाचा – VIDEO : अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ऐकलं का? ५ तासांमध्येच १० लाखांपेक्षा अधिक लोकांची पसंती

सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. पण अद्यापही हृतिक-सबाने आपल्या नात्याची जाहिर कबुली देणं टाळलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan and his girlfriend saba azad tie knot soon actor second marriage rumours see details kmd