अमेरिकन सध्या आयफा अवॉर्ड्स २०१७ चा दिमाखदार सोहळा एन्जॉय करत आहेत. या सोहळ्याची झिंग अजूनही तिथल्या प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. सैफ अली खान आणि करण जोहरने सुत्रसंचालनाची जवाबदारी स्वीकारत कार्यक्रमात एकच रंगत आणली होती. कार्यक्रमाचा पहिला परफॉर्मन्स आलिया भट्टने सादर केला. तिच्या गाण्यात तिने मध्येच वरुण धवनलाही सहभागी करुन घेतले आणि त्याच्यासोबत डान्स केला. सोशल मीडियावर तिच्या गाण्याची चर्चा अजूनही सुरुच आहे. या पुरस्कार सोहळ्यातील पहिला पुरस्कार ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला मिळाला. वरुण धवनला ढिशूम सिनेमासाठी विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला. वरुणचा हा पहिला आयफा पुरस्कार आहे आणि पहिल्याच वेळेत त्याला हा पुरस्कार मिळाल्यामुळे सध्या तो भलताच खूश आहे. आलिया ही एकमेव सेलिब्रिटी आहे जिने आयफा रॉक्स आणि आयफा ग्रीन कार्पेटवर लोकांची मनं जिंकली.

विजेत्यांची संपूर्ण यादी-

सर्वोत्कृष्ट सिनेमा- नीरजा

सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहिद कपूर (उडता पंजाब)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (उडता पंजाब)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अनिरुद्ध रॉय चौधरी (पिंक)

सर्वोत्कृष्ट सहकलाकार पुरुष- अनुपम खेर (एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी)

सर्वोत्कृष्ट सहकलाकार स्त्री- शबाना आझमी (नीरजा)

२५ वर्षांच्या सांगितीक प्रवासाबद्दल एआर रेहमानचा सत्कार करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरूष- दिलजीत दोसांज (उडता पंजाब)

सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)- दिशा पटानी- एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी

मिंत्रा स्टाईल आयकॉन- आलिया भट्ट

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- तुलसी कुमार (एअरलिफ्ट)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर (उडता पंजाब)

सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका- जिम सर्भ (निरजा)

सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार- वरुण धवन (ढिशूम)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- प्रितम (ऐ दिल है मुश्किल)

सर्वोत्कृष्ट गीतकार- अमित भट्टाचार्य (चन्ना मेरे या..- ऐ दिल है मुश्किल)

वुमन ऑफ दि इयर- तापसी पन्नू (पिंक)

सलमान खान, आलिया भट्ट, कतरिना कैफ, शाहिद कपूर, वरुण धवन, सुशांत सिंग राजपुत आणि क्रिती सेनन यांनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स दिले. कतरिनाने तिच्या अफगाण जलेबी, गलती से मिस्टेक आणि काला चश्मा यावर डान्स केला.

https://twitter.com/KatrinaKaifTeam/status/886445861328175104

वरुणसाठी हा सोहळा फार खास असणार आहे. कारय आयफा सोहळ्यात तो त्याचा आगामी सिनेमा ‘जुडवा २’ मधील गाण्यावर परफॉर्म करणार आहे. त्याने यासंबंधीत डान्स प्रॅक्टीसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.