छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ आजवर या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गायकांचे शोने संपूर्ण आयुष्य बदलले. इंडियन आयडल ही स्पर्धा जिंकणारे गायक सध्या चांगलेच लोकप्रिय आहे. इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. अभिजीत सावंतचे आयुष्य रातोरात बदलले होते. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान इंडियन आयडॉलचा विजेता झाल्यावर आयुष्य सोपं झालं का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर त्याने यावर स्पष्टपणे उत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीत सावंत याने नुकतंच बीबीसीला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्याबद्दल प्रसारमाध्यमात येणाऱ्या बातम्यांविषयी विचारण्यात आले. त्याबरोबरच इंडियन आयडॉलचा विजेता झाल्यावर आयुष्य सोपं झालं का? असेही त्यांनी विचारले. त्यावर तो म्हणाला, “मी इंडियन आयडलचा विजेता ठरल्यानंतर अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनी माझी स्तुती केली होती. ती ऐकून मी भारावून गेलो होतो. त्यावेळी लोकांकडून मिळालेलं प्रेम, आंनद यातून काही दिवसांनी सावरणं गरजेचं होतं. मी या इंडस्ट्रीतून गायब कधीच झालो नव्हतो. पण मी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही.”
आणखी वाचा : “आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा

“इंडियन आयडलचा शो संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका मासिकाने त्यांच्या फ्रंट पेजवर मी शोमध्ये हेराफेरी केल्याची बातमी छापली. ती बातमी वाचल्यानंतर माझी ट्रेनिंग सुरु झाली होती. या इंडस्ट्रीत कसं राहायचं? निगेटिव्हिटीपासून स्वतःला लांब कसं करायचं हे मी त्यावेळी शिकलो. यानंतर काही दिवसांनी आणखी एक बातमी प्रसिद्ध झाली. ज्या बातमीचं हेडिंग होतं, अभिजीत सावंत झाला बेघर. तर दुसऱ्या एका बातमीत मला मुंबईच्या नव्हे तर दिल्लीच्या मुली आवडतात, असेही लिहिण्यात आले होते.

यानंतर अजून एक विचित्र बातमी छापून आली होती. मी मुंबईत एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी मी सतत प्रवास करायचो. त्यामुळे मी जाड झाले होते. त्यात मी घट्ट असा टीशर्ट घातला होता. त्यात माझं पोट दिसत होतं. त्यावेळी तिथे माझा फोटो काढला आणि पेपरमध्ये छापला. त्याखाली मला याला यश पचलेलं दिसत नाही, असंही लिहिण्यात आलं आहे. आज पण रोज माझ्या वाचनात येतं की मी कुठंतरी गायब झालोय”, अशी खंत त्याने बोलून दाखवली.

आणखी वाचा : “अचानक छातीत दुखू लागलं आणि…” सागर कारंडेने केला तब्येतीबद्दल खुलासा

“मला कार्यक्रम संपल्यानंतर अनेक वाईट अनुभव आले. या वाईट अनुभवांविषयी बोलताना तो म्हणाला, “शो मोठा असल्याने लोकांनी स्वतःचं स्वतःची मतं बनवली होती. जेव्हा शो सुरु होता तेव्हा आमच्यासोबत एक पीआर एजंट होता. त्यावेळी आमच्याबद्दल चांगले लेख, बातम्या छापल्या जायच्या. पण जसं शो संपला आणि मी खऱ्या जगात आलो तेव्हा मात्र मीडिया आणि लोक फार बदलले होते.

मी एकदिवस माझ्या पीआर एजंटला फोन केला. त्यावेळी आमची छान मैत्री झाली होती. पण तेव्हा तो फोनवर माझ्याशी नीट बोललाच नाही. त्याने मला याच्याशी बोल, त्याच्याशी बोल असं सांगितलं. थोडक्यात तुझं तू बघ असं त्याला म्हणायचं होतं. तेव्हा मला समजलं की आपण ज्या पद्धतीने विचार करतो, त्या पद्धतीने जग चालत नाही. मी छोट्या कुटुंबातून असल्यामुळे मला तिथं जागा मिळवणं खूप अवघड होतं”, असेही त्याने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian idol first season winner abhijeet sawant talk about how the life change after the show nrp