बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. जेव्हा त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली होती तेव्हा हृतिकच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. लग्नाच्या १४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. तरी देखील ते अजूनही त्यांच्या मुलांसाठी नेहमीच एकत्र येताना दिसतात. हे अजूनही चांगले मित्र आहेत. मात्र, आता सुझानने तिच्या आयुष्यात मुव्हऑन केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
“सुझान हृतिकला मागे टाकत एका नवीन रिलेशनशिपमध्ये आली आहे. सुझान अभिनेता अली गोनीच्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अर्सलन असे अलीच्या भावाचे नाव आहे. अर्सलन देखील एक अभिनेता आहे. सुझान आणि अर्सलन सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखत आहेत.” ही माहिती सुझानच्या जवळच्या व्यक्तीने दिल्याचे वृत्त पिंकव्हिलाने दिले आहे.
ती व्यक्ती म्हणाली, “ते गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखत आहेत. टीव्ही जगतात त्यांच्या कॉमन फ्रेंड्समुळे ते भेटले. पण, अलीकडे ते दोघे थोडे जास्त जवळ आले आहेत. त्यांच्या देहबोलीवरून ते फक्त मित्रनाही असे स्पष्टपणे दिसते. अर्सलन आणि सुझान बऱ्याच वेळा त्यांच्या मित्रांसोबच एकत्र बसून वेळ घालवताना दिसतात.”
हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. सुझान आणि अर्सलनने त्याच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.