फराह खान तिच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तिचा कूक दिलीपबरोबर विविध सेलिब्रिटींच्या घरी जाते. ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. त्यांचे मजेदार संभाषण खूप पसंत केले जात आहे. अलीकडेच तिच्या नवीनतम ब्लॉगमध्ये फराहने जॅकी श्रॉफ यांच्या फार्महाऊसला भेट दिली.
फराहच्या व्हिडीओद्वारे चाहत्यांना अभिनेत्याच्या आलिशान फार्महाऊसची झलक पाहायला मिळाली. जेव्हा फराह फार्महाऊसमध्ये आली तेव्हा जॅकी त्यांच्या जॅकूझीमध्ये आराम करत होते.
फराहने तिच्या ब्लॉगमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या भव्य फार्महाऊसचे दृश्य दाखवले. जेव्हा ती आणि दिलीप आले तेव्हा जॅकी जॅकूझीमध्ये होते. हे पाहून फराहने दिलीपला विचारले, “आता तू त्यांच्या कसे पाया पडणार?” जॅकी यांनी नकार दिला आणि दिलीपला म्हणाले, “माझे पाय स्पर्श करू नकोस, फराहचे पाय स्पर्श कर, तुला खूप आशीर्वाद मिळतील, ती तुला चमकवत आहे.”
हे ऐकून फराह म्हणाली, “त्यांनी (जॅकी श्रॉफ) मला चमकवले आणि आता मी तुला चमकवत आहे.” हे ऐकून जॅकी यांनी म्हटले की, फराहला त्याने नाही तर त्याच्या प्रतिभेने चमकवले. जॅकी यांनी लगेच दिलीपचे पाय स्पर्श केले, यामुळे फराह आणि दिलीप आश्चर्यचकित झाले आणि मग ते हसायला लागले.
नंतर जेव्हा जॅकी यांनी लुंगी घातली तेव्हा दिलीप त्यांच्या पायांना स्पर्श करायला गेला, पण जॅकी यांनी त्याला थांबवले आणि जणू काही ते कबड्डी खेळत असल्यासारखे वागू लागले. हे पाहून फराहने दिलीपला विचारले, “तू काय करतोयस?” जॅकी दिलीपकडे पाहात कबड्डी कबड्डी म्हणत राहिले. दिलीपने पुन्हा सांगितले की त्यालाही जॅकी दादासारखी लुंगी घालायची आहे. तो म्हणाला, “दादा, मलाही अशी लुंगी घालायची आहे.” फराहने गमतीने जॅकी श्रॉफ यांना सांगितले की तुमची देऊ नका, दुसरी द्या.
त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी दिलीपला दुसरी लुंगी आणली आणि ती घालण्यास मदत केली. लुंगी घालताना दिलीपने फराहला विचारले की त्याने त्याची पँट काढून ती घालावी का. हे ऐकून जॅकी यानी दिलीपला गमतीने म्हटले, “फराहजीसमोर? मी तुला कानाखाली मारेन.”
