अभिनेत्री कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. अनेकदा वेगवेगळ्या पोस्टमुळे चर्चेत येणाऱ्या कंगनाला नुकतच तिच्या बोल्ड लूकमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. बुडापेस्टमध्ये ‘धाकड’ सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर एका पार्टीचं आयोजन करण्यातं आलं होतं. या पार्टीत कंगनाने पांढऱ्या रंगाचं ब्रालेट परिधान केलं होतं. या कपड्यांवरून कंगनाला ट्रोल करण्यात आलं होतं.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. “इतरांना भारतीय संस्कृती आणि सनातनचं ज्ञान देतेस आणि स्वत: असे कपडे परिधान करतेस” असं म्हणत नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. त्यानंतर आता कंगना आता ‘धाकड’ सिनेमाचं शूटिंग संपवून भारतात आली आहे, कंगनाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलंय. यावेळी कंगनाने निळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केल्याचं दिसतंय. कंगनाचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने कंगनाचा हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

हे देखील वाचा: “इथे काही लोक तुमच्याकडून अशी कामं करून घेतील जी…”, रिचा चड्ढाने केला बॉलिवूडचा पर्दाफाश

या व्हिडीओत कंगनाने तिचं मास्क काढून हातात पकडल्याचं दिसतंय. त्यामुळे मास्क आणि कपड्यांवरून कंगनाला ट्रोल करण्यात आलंय. एक नेटकरी म्हणाला, “आता पूर्ण कपडे घालून ही बॉलिवूडला संस्कारांचं भाषण देणार” तर दुसरा युजर म्हणाला, “भारतात परतताच सलवार सूट खूप ड्रामेबाज आहे ही” तर आणखी एका नेटकऱ्याने कंमेटं करत म्हंटलं, “ज्ञान देणारी देवी तुझं मास्क कुठे आहे?”

(Photo-Instagaram@viralbhayani)

अनेक नेटकऱ्यांनी कंगनाने मास्क न घातल्याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. या आधीदेखील कंगना एअरपोर्टवर बिना मास्क स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे मास्क न घालणाऱ्या कंगनाला नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोल केलं आहे.

हे देखील वाचा: “आता तिसरा बकरा”; मित्रासोबत शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे अभिनेत्री श्वेता तिवारी ट्रोल

कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती तेजस’ आणि ‘धाकड’ या सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिकेत झळकणार आहे.