सलमान खानच्या ईद पार्टीला का गेली होती कंगना रणौत? अखेर समोर आलं खरं कारण

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौत सलमान खानच्या ईद पार्टीमध्ये दिसली होती.

kangana ranaut, salman khan, salman khan eid party, arpita khan sharma, arpita khan eid party, सलमान खान, अर्पिता खान, कंगना रणौत, सलमान खान ईद पार्टी, अर्पिता खान व्हिडीओ
कंगना सलमानच्या पार्टीत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मागच्या काही दिवसांपासून सलमान खानसोबतच्या वाढत्या मैत्रीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कंगना रणौत सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या ईद पार्टीमध्ये दिसली होती. बॉलिवूडच्या कोणत्याही कार्यक्रमाला किंवा पार्टीला हजेरी न लावणारी कंगना सलमानच्या पार्टीत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या मागचं खरं कारण समोर आलं आहे. स्वतः कंगनानंच या पार्टीला जाण्याचं कारण स्पष्ट केलंय.

रेडिओ होस्ट सिद्धर्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतनं या सलमान खानच्या पार्टीला हजेरी लावण्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं. ‘तुझ्या आणि सलमान खानच्या नव्या इक्वेशनबद्दल काय सांगशील?’ असं कंगनाला या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावर कंगना म्हणाली, ‘मला पार्ट्यांना जाणं अजिबात आवडत नाही. पण सलमान खान माझा चांगला मित्र आहे. त्यामुळेच मी या पार्टीसाठी गेले होते.’

कंगना पुढे म्हणाली, “यावर्षीच्या ईद पार्टीसाठी सलमाननं स्वतः मला कॉल केला होता आणि या पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. सलमान खान माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्यानं मला फोन केला तर मी त्याच्या पार्टीसाठी गेले. ही खूप सामान्य गोष्ट होती बाकी काहीच नाही.”

दरम्यान सलमान खाननं कंगना रणौतचा आगमी चित्रपट ‘धाकड’साठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानं कंगना रणौतच्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना कंगनासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. कंगना रणौतचा ‘धाकड’ चित्रपट येत्या २० मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपाल देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut open up about why she attend salman khan eid party mrj

Next Story
‘येरे येरे पावसा’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर पाहिलात का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी