‘जब वी मेट’च्या गीतपासून ते ‘कभी खुशी कभी गम’च्या पू पर्यंत, करीना कपूरने अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी एक तिचा ‘चमेली’ हा कल्ट चित्रपट आहे.
या चित्रपटात चमेलीची भूमिका करणारी करीना एका सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसली होती. करीनाने तिच्या अभिनयाने या भूमिकेत आणि चित्रपटात जिवंतपणा आणला. हा चित्रपट २००३ सालच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक बनला आणि अनेक पुरस्कारही जिंकले. पण, तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटासाठी करीना निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.
या अभिनेत्रीला ‘चमेली’ हा चित्रपट करण्यात आला होता ऑफर
करीनाच्या आधी, निर्मात्यांनी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर राष्ट्रीय क्रश बनलेल्या अमिषा पटेलला ‘चमेली’ चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी संपर्क साधला होता. परंतु, काही कारणास्तव अमिषाने हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि नंतर ही भूमिका करीनाला ऑफर करण्यात आली. या चित्रपटाने करीनाच्या कारकिर्दीला जबरदस्त चालना दिली. हा चित्रपट प्रेक्षकांना तसेच समीक्षकांनाही आवडला. ‘चमेली’मधील उत्कृष्ट कामासाठी करीनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कार मिळाला आणि चित्रपटाला सिनेमोटोग्राफीसाठी पुरस्कारही मिळाला.
करीना कपूरने २००० साली आलेल्या ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून बॉलीवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. ‘चमेली’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केलं आहे. या चित्रपटात करीनाचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. चित्रपट समीक्षकांनी या सिनेमातील करीनाच्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. बेबो शेवटची आमिर खानबरोबर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला तरी चाहते तिच्या अभिनयाने प्रभावित झाले होते. करीना कपूर खानला बॉलीवूडमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे.
‘चमेली’च नाही तर अमिषा पटेलने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारले आहेत. ‘लगान’ चित्रपटासाठी अमिषा पटेललाही अप्रोच करण्यात आले होते. याशिवाय अमिषाने ‘यादें’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘चलते चलते’, सलमान खानचा ‘तेरे नाम’, ‘सिंग साब द ग्रेट’ आणि ‘मेरे यार की शादी है’ हे चित्रपटही नाकारले आहेत. यातील बहुतांश चित्रपट हे मोठे हिट ठरले.