बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना गेल्या काही दिवसांपासून धाकटा मुलगा जहांगीरच्या नावामुळे चर्चेत आहे. जहांगीरच्या नावाचा खुलासा करीनाने तिच्या ‘करीना कपूर खान प्रेंग्नेसी बायबल’ या पुस्तकात केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत करीनाने तैमूरचं जेहसोबत बॉन्ड कसं आहे ते सांगितल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीनाने ‘एनडीटीव्ही’ला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तैमूर जेव्हा पहिल्यांदा जेहला भेटला तेव्हा त्याची प्रतिक्रिय कशी होती, या विषयी सांगितले आहे. ‘सैफ आणि मी सुरुवातीला चिंतेत होतो की, ज्याप्रमाणे दुसऱ्या मुलांना त्यांच्या भावंडांचा हेवा असतो तसाच तैमूर जेहचा हेवा करेल. पण तैमूरने तसे अजिबात केले नाही. खरतंर घरात नवीन सदस्य आल्याने तैमूर खूप आनंदी झाला होता’, असे करीना म्हणाली.

आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स व्हायरल

करीना पुढे म्हणाली, ‘तैमूर मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडतो आणि जेहची काळजी घेतो. जेव्हा पण आमचे मित्र घरी येतात तेव्हा तैमूर बोलतो की तुम्ही माझ्या लहान भावाला पाहिलतं का? तुम्ही त्याला हॅलो बोललात का? एवढंच नाही तर जेव्हा सैफ आणि ती तैमूरला चिडवतात की ते त्याच्या भावाशिवाय सुट्टीवर जाऊ, तेव्हा तो स्पष्टपण नकार देतो आणि म्हणतो नाही जेहशिवाय नाही.’

आणखी वाचा : रिया कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जान्हवी आणि खूशी कपूरला पाहून नेटकरी संतापले

दरम्यान, सैफच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब मालदिवला गेले होते. त्यावेळी करीनाने तिथला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सैफ, करीना, तैमूर आणि जेह दिसत आहेत. हा फोटो शेअर करत करीनाने सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor khan opens up about son taimur ali khan bond with baby jeh aka jehangir dcp