बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या ती विलगीकरणात असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानचा आज ५ वा वाढदिवस आहे. पण करोनामुळे तिला तिच्या मुलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करता येणार नाही. दरम्यान लाडक्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त करीनाने त्याच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तैमूरने जेव्हा पहिल्यांदा चालायला सुरुवात केली तेव्हाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात गोंडस तैमूर चालत असताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ तो पहिल्यांदा चालायला शिकला त्यादरम्यानचा आहे. करीनाने शेअर केलेल्या व्हिडीओत तैमूर चालायला शिकत असल्याचे दिसत आहे. यावेळी तो चालत असतानाच अचानक अडखळतो. त्यानंतर तो पडतो, असे या व्हिडीओत दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना करीनाने छान कॅप्शन दिले आहे. तुझे पहिलं पाऊल, पहिल्यांदा धडपडणं… या सर्व गोष्टी मी अभिमानाने रेकॉर्ड केल्या आहेत. माझ्या प्रिय मुला, हे नक्कीच तुझे पहिले आणि शेवटचे धडपडणे नक्कीच नाही. पण मी हे सर्व खात्रीने सांगू शकतो की तू उठून स्वत:ची काळजी घेशील. तू निश्चित पुढे जाशील आणि ताठ मानेने जगशील. कारण तू माझा वाघ आहेस. माझ्या हृदयाचे ठोके असलेल्या तैमूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझा टिम टिम… तुझ्यासारखा कोणीही नाही, असेही करीनाने म्हटले आहे.
करीनाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या ती आयसोलेशनमध्ये राहत आहे. दरम्यान पहिल्यांदाच तैमूरच्या वाढदिवशी ती त्याच्यापासून दूर आहे. त्यामुळे ती तिच्या मुलांची फार आठवण काढत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे करीनाने यावेळी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत रागही व्यक्त केला आहे. “कोविड मी तुझा तिरस्कार करते. मला माझ्या बाळांची आठवण येतेय. पण…आम्ही लवकरच पुन्हा भेटू”, असे तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे.
करीना कपूर खानचा लेक तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीचा पगार माहितीये का?
दरम्यान बॉलिवूड कलाकारांसोबतच त्यांची मुले देखील कायम चर्चेत असतात. या स्टारकिड्सविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. या सर्वांमध्ये तैमूर हा सर्वांचा लाडका स्टारकिड आहे. त्याचे अनेक फोटो व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात.