कलर्स टीव्हीचा सगळ्यात लोकप्रिय शो असलेला ‘खतरों के खिलाडी’चा सिझन 11 सध्या बराच चर्चेत आलाय. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बडे कलाकार या शोमध्ये सहभागी होण्यासाठी केपटाउनमध्ये येऊन पोहोचले आहेत. केपटाउनमध्ये या शोसाठीची शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच शोच्या पहिल्या एलिमिनेशनमध्ये ‘बिग बॉस’ एक्स कंटेस्टेंट विशाल आदित्य सिंह बाहेर झालाय. त्यानंतर आणखी एक कंटेस्टेंट या शोमधून आऊट झाला असल्याची माहिती मिळतेय. शोमधून बाहेर झालेला हा दुसरा कंटेस्टेंट सुद्धा ‘बिग बॉस’चा एक्स कंटेस्टेंट होता.

बॉलिवूड गायिका आस्था गिलने नुकतंच ‘खतरों के खिलाडी 11’ च्या सेटवरून एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ती वरूण सूदसोबत दिसून आलीय. आस्थाच्या या फोटोवर ‘बिग बॉस 14’ मधील एक्स कंटेस्टेंट निक्की तंबोळीने जी कमेंट केली आहे, त्यावरून विशाल आदित्य सिंहनंतर ती ‘खतरों के खिलाडी 11’ मधून आऊट झाली असल्याचा अंदाज बांधला जातोय. आस्थाच्या फोटोवर कमेंट करत निक्कीने लिहिलंय, “तुमच्यासोबत पुन्हा मस्ती करण्यासाठी आणखी वाट नाही पाहू शकत मित्रांनो…खूप मिस करते तुम्हाला…!”.

काही दिवसांपूर्वीच ‘खतरों के खिलाडी 11’ शोचं पहिलं वहिलं एलिमिनेशन पार पडलं. याच विशाल आदित्य सिंह हा शोमधून बाहेर गेला. या एलिमिनेशनमध्ये विशाल, निक्की तंबोळी आणि अनुष्का सेन हे तिघेही एकत्र बॉटम 3 मध्ये होते. यातून विशाल सिंह हा ‘खतरों के खिलाडी 11’ शोमधून आऊट झालेला पहिला स्पर्धक आहे. त्यानंतर आता निक्की तांबोळीने केलेल्या कमेंटवरून तरी विशालनंतर ती शोमधून आऊट झालेली दुसरी स्पर्धक आहे, असं बोललं जातंय.

किती एपिसोडमध्ये होणार हा शो ?
शोच्या शूटिंगसाठी केपटाउनमध्ये गेलेली सर्व टीम येत्या जूनमध्ये भारतात परतणार होती, त्यानुसार त्यांचे तिकीट देखील बुक करण्यात आले होते. परंतू देशभरात करोनाचा हाहाकार सुरू असल्याचं पाहून शोच्या मेकर्सनी ‘खतरों के खिलाडी 11’ची शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण टीमला भारतात येण्याचे आदेश दिले आहेत. यामुळेच हा शो एकूण १२ एपिसोडमध्ये शूट करून संपवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. केपटाउनमध्ये गेलेली सर्व टीम शूटिंग संपवून येत्या महिन्याभरात भारतात परतणार आहे.