९० च्या दशकात आपल्या चित्रपटांनी प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आजही करोडोंच्या दिलाची धडकन आहे. बॉलिवूडमधील या एव्हरग्रीन अभिनेत्रीची क्रेझ आजही तितकीच आहे. मध्यंतरीच्या काही वर्षात ती अमेरिकेत वास्तव्याला असताना प्रेक्षक तिला मोठ्या पडद्यावर बघण्याची आतुरतेने वाट बघत होते. अखेर काही वर्षांपूर्वी तिने चित्रपटसृष्टीत कमबॅक केला. तिच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. आता लवकरच ती एका चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. त्या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : तेलंही गेलं, तूपही गेलं अन्…, ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशामुळे अनन्या पांडेच्या करिअरवर परिणाम

माधुरी दीक्षित, गजराज राव, ऋत्विक भौमिक आणि बरखा सिंग यांचा आगामी चित्रपट ‘मजा मा’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात इंडस्ट्रीतील दिग्गजांसह नवीन चेहऱ्यांनी सजलेली एक उत्कृष्ट स्टारकास्ट आहे. या चित्रपटात माधुरीच्या बरोबर गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग, शीबा चढ्ढा, मल्हार ठकार आणि निनाद कामत यहे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर याचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. हा चित्रपट म्हणजे एक विनोदी कौटुंबिक ड्रामा असेल.

आणखी वाचा : द फेम गेम’ सिरीजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्स प्रदर्शित करणार नाही; कारण…

इंग्रजी न बोलता येणारे वडील, रागीट बहीण, ९ ते ५ नोकरी करणारा मुलगा आणि अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने कुटुंबियांची काळजी घेणारी आई (माधुरी दीक्षित), अशी या चित्रपटात पात्रं आहेत. यात माधुरी पल्लवी हे पात्र सकारत आहे. तिच्या मुलाचे एका मुलीवर जीवापाड प्रेम असते. मुलीच्या घरच्यांनाही मुलगा पसंत असतो पण मुलापेक्षा जास्त त्यांना माधुरीच आवडते. पण त्यानंतर माधुरी अशी काय चुक करते की त्याचे परिणाम सगळ्या कुटुंबाला भोगावे लागतात आणि ती त्यातून कसा मार्ग काढते हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओजवर प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit upcoming film maja ma trailer got released rnv