‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेता घेणार तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक, कारण आले समोर

त्यामुळेच त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

majhi tujhi reshimgath
majhi tujhi reshimgath

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे. या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. मात्र या मालिकेतील एक कलाकार हा काही दिवस या मालिकेतून ब्रेक घेणार आहे. सध्या नेहा आणि यशचा संसार खुलू लागला आहे. त्यातच विश्वजित काका या मालिकेतून तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक घेणार आहेत.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत विश्वजित चौधरी हे पात्र आनंद काळे यांनी साकारले आहे. या पात्रामुळे घराघरात त्यांना ओळख मिळाली आहे. मात्र पुढील काही दिवस ते या मालिकेतून ब्रेक घेणार आहेत. आनंद काळे हे बाईकवरुन ‘कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख’ अशी सफर करणार आहेत. त्यामुळेच त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

त्यांनी काही वर्षांपूर्वीच Kawasaki Ninja 1000 ही गाडी खरेदी केली होती. पण पुढील २१ दिवस ७००० किलोमीटरचा प्रवास करुन ते आपले स्वप्न पूर्ण करताना दिसणार आहेत. यामुळे त्यांनी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच संगीतकार अजय अतुल फेम अतुल गोगावले यांनी BMW R1250 GS ही स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. त्यावेळी आनंद काळे यांनी अतुल गोगावले यांचे अभिनंदन करत ‘चला आता राईडला लेह लडाख इन जुलै’ असे म्हटले होते.

नुकतंच त्यांनी याबाबत पोस्ट शेअर केली आहे. “अरे मुलांनों!!! तयार व्हा! तुमचे शूज आणि जॅकेट तयार ठेवा…, आतापर्यंतच्या सर्वात लांब बाइक राइडसाठी माझ्यासोबत तयार व्हा. माझ्या बकेट लिस्टमधील आणखी एक कामासाठी मी निघत आहे. कोल्हापूर ते काश्मीर-लेह लद्दाख….अंदाजे ७००० किमी. तुमच्या सर्वांना खूप खूप प्रेम. निरोगी राहा आणि सुरक्षित रहा. तसेच मला पुढील २१ दिवसांसाठी मिस करा.”, असे त्याने यात म्हटले आहे. त्यामुळे आता आनंद काळे महिनाभर तरी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून दिसणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले आहे.

आनंद काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्य तसेच चित्रपट, मालिका सृष्टीत कार्यरत आहेत. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या आनंद यांनी आपले शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. आनंद काळे हे हॉटेल व्यावसायिक आहेत हे बऱ्याच जणांना माहीत आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध हॉटेल कार्निव्हल आणि राजपुरुष यांचे ते मालक आहेत. हॉटेल व्यवसायासोबत त्यांचा गणरायाच्या मुर्त्या बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला त्यांच्या कुटुंबियांची देखील साथ मिळताना दिसते. आनंद यांना स्पोर्ट्स बाईक्सची अत्यंत आवड आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच आनंद यांनी बायकिंग आणि रेसिंगमध्येही सहभाग दर्शवला होता. त्यांचे लक्झरी बाईक आणि लक्झरी कार प्रेम त्यांच्या मित्रपरिवाराला चांगलेच परिचयाचे आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Majhi tujhi reshimgath vishwjeet kaka fame anand kale may took break nrp

Next Story
“काय झाडी, काय डोंगार, काय प्राजक्ता…”; प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची चर्चा, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी