अपघातानंतर मलायका अरोरा पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या रिसेप्शन पार्टीत दिसली होती. मलायका अरोरा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत रिसेप्शनमध्ये पोहोचली होती. रिसेप्शनबाबत नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान मलायकाने सांगितले की, तिला या पार्टीत जायचे नव्हते. या पार्टीत जाण्यासाठी लोकांना अनेक बहाणे करावे लागले. याचे कारण दुसरे तिसरे काही नसून मलायकाच्या कारचा अपघात आहे.

मलायकाने नुकतीच ‘बॉम्बे टाइम्स’ला मुलाखत दिली होती. “मी शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. पण माझी मानसिक स्थिती अजूनही सावरलेली नाही. माझ्या मनात त्या दुर्घटनेची भीती अद्याप आहे. त्यामुळे मला बाहेर जायची, कारमध्ये बसण्याची खूप भीती वाटते. अशात मी बाहेर जावं म्हणून मला समजावलं जातं. अगदी रणबीर- आलियाच्या रिसेप्शन पार्टीला जाण्याची देखील मला भीती वाटत होती. मी तिथे पोहाचले तेव्हा माझ्या कारच्या बाजूला असलेल्या लोकांना पाहून मी घाबरले होते. आता मी जेव्हा जेव्हा कारमध्ये बसते तेव्हा लगेच सीटबेल्ट लावते. जरी कारमध्ये मागे बसले तरीही मी सीटबेल्ट लावून ठेवते,” असे मलायका म्हणाली.

आणखी वाचा : नवरीने नवरदेवाला पाण्यात धक्का देण्याच्या प्रयत्नात घडले असे काही, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : राज ठाकरे यांच्या नातवाची पहिली झलक, फोटो व्हायरल

अपघाताबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, “लोकांनी मला सांगितले की, मी बेशुद्ध अवस्थेत सतत माझ्या आई आणि मुलाबद्दल विचारत होते. त्यावेळी मी फक्त या दोनच गोष्टींसाठी प्रार्थना करत होते, एक मला मरायचे नव्हते, दुसरे मला माझे डोळे गमवायचे नव्हते. तो अपघात खूप भयानक होता. कारच्या काचेचे छोटे तुकडे माझ्या डोळ्यात गेले होते आणि मला काहीच नीट दिसत नव्हतं. त्यावेळी मी सेटवर परत जाण्याबद्दल बडबड करत होते.”

आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा

मलायकाच्या गाडीला मुंबई-पुणे हायवेवर २ एप्रिलला अपघात झाला होता. खोपोली एक्सप्रेस-वेवर मलायकाच्या कारला अपघात झाला होता. तीन कार एकत्र एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला होता. मात्र सुदैवाने यामध्ये कोणी गंभीर जखमी झालं नाही. मलायकाने या अपघाताची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती.