काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये जजच्या भूमिकेत झळकली होती. या शोमधील स्पर्धकांच्या परफॉर्मन्सने मलायकाचं मनं जिकंल होतं. एवढचं नव्हे तर एका चिमुकलीच्या परफ़र्मन्सने मलायकाला कायम सतावणाऱ्या एका कमतरतेची पुन्हा एकदा जाणीव झाली. या शोमधील फ्लोरिनाच्या डान्स परफॉर्मन्सने मलायकाला भावूक केलं. यावेळी आपल्यालाही एक मुलगी हवी होती अशी भावना मलायकाने व्यक्त केली.
खास एपिसोड विषयी मलायकाने ईटीटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मलायकाच्या मनाला स्पर्श करणाऱ्या त्या खास परफॉर्मन्सच्या वेळी तिच्या मनात काय भावना होत्या या प्रश्नावर मलायका म्हणाली, “आपल्या मुलांच्या आसपास राहणं कोणत्याही आईला आवडतं. फ्लोरिना माझ्या हृदयाला भिडली. तिच्या परफॉर्मन्सने मी न कळत तिच्याशी जोडले गेले. मी अशा कुटुंबातून आले जिथे खूप मुली होत्या आणि आता आमच्या कुटुंबात फक्त मुलचं आहेत. माझं माझा मुलगा अरहानवर प्रचंड प्रेम आहे. पण मला एक मुलगी असावी अशी माझी इच्छा होती.” असं मलायका यावेळी म्हणाली.
हे देखील वाचा: “काय केलं होतं आणि काय झालं”; बिग बी अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल
पुढे मलायका म्हणाली, “मला बहिण आहे आणि आम्ही एकमेकींसोबत अनेक गोष्टी शेअर करतो. एकमेकींच्या पाठिशी उभ्या राहतो. त्या दिवशीचा फ्लोरिनाचा डान्स पाहून मी भावूक झाले. माझीही इच्छा होती की मला एक मुलगी असावी आणि मी तिला सुंदर कपडे घालावे आणि त्या सर्व वेडयासारख्या गोष्टी तिच्यासोबत कराव्या.” असं म्हणत मलायकाने मुलगी नसल्याची खंत व्यक्त केली.
हे देखील वाचा: शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबतचा ‘तो’ फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी सरोगसीच्या मदतीने मुलांना जन्म दिलाय किंवा दत्तक मूल घेतलंय. त्यामुळे मलायकाचा देखील असा काही विचार आहे का? असा सवाल तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर ती म्हणील, “हो माझ्या अनेक मित्र मैत्रीणींनी मूल दत्तक घेतलंय. ही एक खूपच चांगली गोष्ट आहे. मूल दत्तक घेण्याबद्दल मी आणि माझा मुलगा अरहानमध्ये अनेकदा चर्चा होते. आपण एखाद्या मुलीला दत्तक घेऊन तिला एक कुटुंब आणि घर देऊ शकतो अशा आणि इतर अनेक विषयांवर आमच्यात चर्चा होतात. मात्र अद्याप तरी असा काही प्लॅन नाही.” असं मलायका अरोरा म्हणाली.
मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला असला तरी अनेकदा ते आपल्या मुलाबरोबर एकत्र वेळ घालवताना दिसतात.