The Bads of Bollywood Fame Manish Chaudhari Love Story : मनीष चौधरी अलीकडेच आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमध्ये दिसला. मनीषने फ्रेडी सोडावाला या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. मनीष २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मनीष आणि त्याची पत्नी श्रुती मिश्रा यांनी त्यांच्या प्रेमकथेबद्दल खुलासा केला. त्यांच्या वयात १७ वर्षांचा फरक आहे. मनीषला वयाच्या बाबतीत फरक पडला नाही; परंतु श्रुतीला तिच्या पालकांना त्यांचे नाते स्वीकारण्याच्या दृष्टीने पटवून देण्यासाठी दोन वर्षे लागली. या जोडप्याने २०२३ मध्ये लग्न केले.
मनीष त्याच्या पत्नीपेक्षा १७ वर्षांनी मोठा आहे
‘हॉटरफ्लाय’शी झालेल्या संभाषणात श्रुतीने मनीषशी झालेल्या तिच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. त्यांची भेट एका थिएटरमध्ये झाली होती. ती म्हणाली, “मुंबईत माझ्यासारख्याच व्यक्तीला भेटून मला खूप आनंद झाला. सुरुवातीपासूनच मी ‘ आय लव्ह यू’ बोलायचे. मनीषला सांगायला मला थोडा वेळ लागला.” त्यांच्या वयाच्या फरकाबद्दल बोलताना श्रुती म्हणाली, “आमच्यात १७ वर्षांचं अंतर आहे. मला वाटतं की, जेव्हा मी त्याला विचारले, ‘तुझे वय किती आहे?’ आणि त्याने मला सांगितले, तेव्हा मी म्हणाले, ‘खरंच?’ मला माहीत होते की, वयाचा फरक आहे; पण तो किती हे मला माहीत नव्हते. मनीष म्हणाला, “वयानं मला कधीही त्रास दिला नाही.”
श्रुती मिश्रा म्हणाली की, वयात फरक असूनही, तिला माहीत होतं की, ते बराच काळ एकत्र राहतील. ती म्हणाली, “मला वाटतं की मनीष आणि माझ्यात झालेल्या पहिल्या संभाषणांपैकी एक म्हणजे ‘मला वयाच्या फरकाबद्दल माहीत नाही. पण मला वाटतं की, आपण खूप काळ एकत्र राहणार आहोत आणि मला वयाची पर्वा नाही. तुला माझ्यापेक्षा जास्त काळ जगावे लागेल. कारण- मी तुझ्याशिवाय एक दिवसही जगू शकत नाही म्हणून मी आधी जाईन आणि तू राहशील.” श्रुतीने सांगितले की, तिच्या कुटुंबाला त्यांचे नाते पटवून देण्यासाठी तिला दोन वर्षे लागली.