मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा यांच्या अभिनयाच्या रेसिपीतून तयार झालेली 'सूप' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला | manoj bajpayee and konkana sen sharma starrer netflix original soup webseries teaser | Loksatta

मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा यांच्या अभिनयाच्या रेसिपीतून तयार झालेली ‘सूप’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या वेबसीरिजचं दिग्दर्शन अभिषेक चौबे याने केलं आहे.

मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा यांच्या अभिनयाच्या रेसिपीतून तयार झालेली ‘सूप’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सूप वेबसीरिज टीझर | soup teaser

बॉलिवूडच्या काही मातब्बर कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता मनोज वाजपेयी. चित्रपटक्षेत्रातील मनोजचं योगदान तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे पण गेल्या काही वर्षात ओटीटी क्षेत्रातही मनोज वाजपेयी हे नाव अदबीने घेतलं जात आहे. ‘फॅमिली मॅन’ या वेबसीरिजनंतर मनोज वाजपेयी यांच्या प्रसिद्धीमध्ये आणखीनच भर पडली आहे. आता मनोज पुन्हा एका आगळ्यावेगळ्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सीरिजचं नाव आहे ‘सूप’.

नेटफ्लिक्सच्या ग्लोबल फॅन इवेंटमध्ये आगामी चित्रपट आणि वेबसीरिजची घोषणा झाली त्यापैकीच एक वेबसीरिज म्हणजे ‘सूप’. यानिमित्ताने या सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हे दोघे मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सीरिजच्या निमित्ताने हे दोन तगडे कलाकार प्रथमच एकत्र काम करत आहेत.

‘सूप’च्या टीझरवरुन तरी याची कथा नेमकी काय असेल हे सांगता येणं कठीण आहे, पण ही एक सस्पेन्स मर्डर मिस्ट्री आहे. टीझरवरुन कोंकणा आणि मनोज हे काहीतरी गडबड गोंधळ करत असून एका मोठ्या प्लॅनची तयारी करताना आपल्याला दिसत आहेत. कोंकणाचं पात्र म्हणजेच स्वाती यादव हीला एक हॉटेल सुरू करायचं आणि आपल्या पतीपासून सुटकाकरून घेण्यासाठी ती तिच्या लव्हरबरोबर एक योजना तयार करते आणि मग या कथेत काही पोलिस ऑफिसर आणि खलनायक यांची एंट्री होते आणि कोंकणा मनोजचा हा प्लॅन आणखीन वेगळंच वळण घेतो असा अंदाज या टीझरवरुन लावता येऊ शकतो.

आणखी वाचा : Photos : दुबईमध्ये साजरा केला नयनताराने विग्नेशचा वाढदिवस; फोटो शेअर करत दोघे म्हणाले “आयुष्य सुंदर आहे”

या वेबसीरिजचं दिग्दर्शन अभिषेक चौबे याने केलं असून त्याने याआधी ‘इश्कीया’, ‘उडता पंजाब’, ‘सोनचिडिया’सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मनोज आणि कोंकणाच्या या ‘सूप’ला आणखीन चवदार बनवण्यासाठी नासर आणि सैयाजी शिंदेसारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या अभिनयाचा मसालाही पुरपूर वापरण्यात आला आहे. आता या ‘सूप’ची चव रसिकांच्या पसंतीस उतरेल की नाही ते लवकरच समोर येईल.सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अजूनतरी गुलदस्त्यातच ठेवली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रश्मिकासह गोविंदा यांचा ‘सामी सामी’ गाण्यावर धम्माल डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

संबंधित बातम्या

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन
“भीमा तू होतास…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त वनिता खरातची खास पोस्ट
“…म्हणून मी ‘कांतारा’सारखा चित्रपट कधीच बनवणार नाही”; ‘तुंबाड’शी तुलना झाल्यावर दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत
“एकाही व्यक्तीने मी खोटं सांगितल्याचं सिद्ध केलं तर…”, विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा, म्हणाले “आता मी काश्मीर फाइल्सचा…”
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “जर उद्या…”
“दबंग’च्या प्रदर्शनानंतर अरबाज…” मलायकाने सांगितलं घटस्फोट होण्यामागचं खरं कारण
प्रदर्शनाआधीच भारतात ‘अवतार २’चा जलवा, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी
Video: माझा नवरा मला… घरगुती कार्यक्रमात बेभान झाली सुनबाई; असं काही केलं की नवऱ्याने तोंडच लपवलं