मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. प्राजक्ता माळीचा राशीभविष्यावर फार विश्वास आहे. नुकतंच तिचे प्रसिद्ध ज्योतिषी अनंत पटवा यांनी तिच्यासाठी येणारे वर्ष कसे असणार आहे, याबद्दलची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध सेलिब्रेटी ज्योतिषी अनंत पटवा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध कलाकरांचे अचूक भविष्य वर्तवताना दिसतात. प्राजक्ता माळीचाही त्यांच्या भविष्यावर विश्वास आहे. नुकतंच अनंत पटवा यांनी प्राजक्ताला येणारे २०२३ हे वर्ष कसं जाईल? तिला लग्नाचा योग आहे का? तिच्याकडे काही नवीन प्रोजेक्टस येणार आहेत का? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

प्राजक्ता माळीचे येणारे वर्ष तिच्यासाठी फारच शुभ असणार आहे. तिच्या जन्मतिथीनुसार गुरुचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे तिला नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती येत्या काळात फार व्यग्र झाल्याचे पाहायला मिळेल. त्याबरोबरच तिचे हे नवीन प्रोजेक्टस तिला भविष्यात उच्च स्थरावर घेऊन जाईल, असा अंदाज अनंत पटवा यांनी वर्तवला आहे.

त्या बरोबरच येत्या २३ जानेवारीनंतर शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा तिला खूप फायदा होईल. तिच्या कामावर याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. विशेष म्हणजे येत्या काळात तिच्याकडे फार मोठे आणि महत्त्वाचे प्रोजेक्ट असणार आहे. त्यामुळे ती सर्वत्र चर्चेत राहिल. तसेच ती फार व्यग्र राहील.

याबरोबरच ती अनेक गुंतवणूकही करणार आहे. येत्या वर्षात अनेक रखडलेल्या गोष्टीही मार्गी लागण्याची शक्यता आहे. तिच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. मालमत्ता खरेदीसाठी तुम्हाला चांगला योग आणि रक्कम देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदा तिला अनेक पुरस्कारांचेही योग प्राप्त होणार आहेत.
आणखी वाचा : “अस्सल दादरकर, आठ वर्षांचे रिलेशनशिप, लग्न अन्…” ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा नेमळेकरबद्दल माहितीये का?

तसेच जुलै २०२३ नंतर तिचे वैयक्तिक जीवन फारच चांगले होणार आहे. मात्र तिला तिच्या आक्रमतेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तिने वायफळ बडबड करु नये. तिला तिच्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. एकूणच २०२३ हे वर्ष चांगले जाईल. तसेच गुरुच्या कृपेमुळे प्राजक्ताच्या लग्नाचे योग दिसत आहेत. मात्र ती कामात व्यस्त असल्याने ती ते पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असाही अंदाज सेलिब्रेटी ज्योतिषी अनंत पटवा यांनी वर्तवला आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’ आणि दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद; सेन्सॉर बोर्डाचा मोठा निर्णय

दरम्यान ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने याबद्दल प्राजक्ता माळीला विचारले असता तिने, “माझा यावर विश्वास आहे. तसेच सेलिब्रेटी ज्योतिषी अनंत पटवा यांनी गेल्या इतक्या वर्षांपासून माझ्याबद्दल केलेली भाकितं ही तंतोतंत खरी ठरली आहेत. त्यामुळे येत्या वर्षात त्यांनी दिलेल्या सूचनांचे मी निश्चितच पालन करेन”, असं ती म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali will get marry in 2023 marriage career prediction by celebrity astrologer actress reaction nrp