अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून नवा वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात आणि चित्रपटात काही बदल सुचवले आहेत.

‘पठाण’ चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. या चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपट निर्मात्यांना दिली आहे. हा संबंधित बदल करुन सेन्सॉर बोर्ड समोर हा चित्रपट सादर करावा, असं प्रसून जोशी यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा : “आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर…” शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, “हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखवण्यात आला. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचे परीक्षण करण्यात आले. यावेळी परीक्षक समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात काही बदल करण्याचे सुचवले आहे. हे सुचवलेले बदल अंमलात कसे आणावे, यासाठी मार्गदर्शनही केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सुधारित आवृत्ती सेन्सॉरकडे सादर करावी”, असे आदेशही सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.

आणखी वाचा : “बॉयकॉट करण्यापेक्षा…” ‘पठाण’मधील बिकिनी वादावर नवनीत राणांचे स्पष्ट विधान

“सेन्सॉर बोर्ड हे नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता यांच्यातील योग्य संतुलन शोधण्यासाठी वचनबद्ध असते. त्यामुळे आपली संस्कृती आणि श्रद्धा यांचा विचार प्रत्येकानं करावा आणि त्याबाबत सावधगिरी बाळगावी. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास महत्वाचा आहे. निर्मात्यांनी त्या दिशेने कार्य करत राहिले पाहिजे”, असेही प्रसून जोशी यांनी म्हटले.

दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.