Amruta Khanvilkar Shares Post On Fathers Day : १५ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या वडिलांबरोबरचे फोटो शेअर केले आणि त्यांच्यासाठी भावनिक नोट्स लिहिल्या.
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अमृता खानविलकरने तिच्या वडिलांबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमृताची आईदेखील आहे.
अनेकदा अमृता खानविलकर तिच्या आईचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आज फादर्स डे निमित्ताने अमृताने वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
अमृता खानविलकर या फोटोला कॅप्शन देत म्हणाली, “मीट राजू खानविलकर- आमचे पप्पा! चिरतरुण व्यक्तिमत्व (माझी त्वचा त्यांच्यामुळेच इतकी छान आहे). सतत पॉझिटिव्ह राहणारे, सतत भटकणारे, आयुष्याने पण खूप फिरवलं – गिरगांव ते विलेपार्ले ते कोथरुड… पण आता वर्ल्ड ट्रॅव्हलर असणारे! आमचे वडील म्हणून खूप स्ट्रिक्ट, पण आजोबा म्हणून एक वेगळ्याच ग्रहावरचे वाटतात – नातवंडांशी वेगळ्याच इंग्लिशमध्ये बोलणारे, ज्यांच्या फोनवर सतत अदितीचा फोटो वॉलपेपर म्हणून लावणारे. आमचे पप्पा…हॅपी फादर्स डे.”
अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अमृता खानविलकर फक्त अभिनयातूनच नाही, तर दमदार नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावरदेखील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं आहे. अमृताने हिमांशू मल्होत्राबरोबर काही वर्षांपूर्वी लग्न केलं.
अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक चित्रपट गाजले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘शाळा’, ‘साडे माडे तीन’, ‘चोरीचा मामला’ आणि ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमांसह तिने ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘मलंग’सारख्या हिंदी सिनेमातदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमात अमृता चंद्राच्या भूमिकेत होती. चंद्रमुखी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
अमृता खानविलकर सोशल मीडियावरदेखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.