अभिनेत्री पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच साखरपुड्याची घोषणा करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तिने इन्स्टाग्रामवर जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले होते. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीचा होणारा नवरा कलाविश्वातील नसल्याने या दोघांचं लग्न नेमकं जुळलं कसं? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. अखेर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी आणि त्यांच्या लव्हस्टोरीविषयी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा सावंत तिची प्रेमकहाणी सांगताना म्हणाली, “माझी प्रेमकहाणी खूपच वेगळी आहे. मला वाटलं नव्हतं एवढ्या पटकन गोष्टी जुळून येतील. आम्ही दोघंही अरेंज मॅरेज पद्धतीत पहिल्यांदा भेटलो. त्याचं स्थळ माझ्यासाठी आईच्या मैत्रिणीने आणलं होतं. पहिल्यांदा मी जेव्हा त्याचा फोटो पाहिला तेव्हाच मला तो आवडला होता. त्यामुळे आईच्या सांगण्यावरून मी त्याला सर्वात आधी फोन केला. त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं.”

हेही वाचा : उमेश कामत : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, वाणिज्य शाखेत पदवी ते ‘आभाळमाया’, रंगभूमीला आपलंस करणारा ‘नवा गडी’!

पूजा सावंत पुढे म्हणाली, “आमचं बोलणं सुरू झाल्यावर आम्ही बराच वेळ घेतला. आम्ही दोघंही एकमेकांच्या हळुहळू प्रेमात पडलो. अशातच एक असा दिवस आलं जेव्हा मनापासून वाटलं…याच मुलाशी आपण लग्न केलं पाहिजे. अशी आमची साधी सुंदर लव्हस्टोरी आहे. अनेकजण मला विचारत असतात एवढे दिवस हे नातं का गुपित ठेवलं. पण, मनापासून सांगायचं झालं, यामुळे मला माझा वेळ मिळाला. मी आणि सिद्धेश आम्ही दोघंही एकमेकांना समजून घेऊ शकलो. तो वेळ फार गरजेचा होता. यानंतर जेव्हा आम्ही दोघंही लग्नासाठी तयार झालो तेव्हा आम्ही कुटुंबीयांना लग्न करायचंय असं सांगितलं.”

हेही वाचा : भरत जाधव : लालबागची चाळ ते पहिली व्हॅनिटी व्हॅन, प्रेक्षकांना बहुरंगी अभिनयाने भुरळ घालणाऱ्या ‘श्रीमंत दामू’ची गोष्ट

“एखादा मुलगा किंवा मुलगी वयात आल्यावर आई-बाबा साहजिकपणे लग्नाच्या मागे लागतात. पण, माझ्या घरी तेवढ्या प्रमाणात माझ्यावर लग्नासाठी प्रेशर देण्यात आलेलं नव्हतं. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की, तुला छानसा जोडीदार भेटावा. सिद्धेशचा फोटो पाहिल्यावर मला पहिल्यांदा काहीतरी जाणवलं. आधी आम्ही फक्त फोनवर बोलायचो…अनेक महिन्यांनी एकमेकांना भेटलो, एकत्र वेळ घालवला. मध्ये बराच काळ गेला आणि आता आम्ही लग्न करतोय” असं पूजाने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress pooja sawant reveals her lovestory and talks about her fiance sva 00