‘चंद्रा’ किंवा ‘वाजले की बारा’ ही गाणी आठवली तरी डोळ्यासमोर अमृता खानविलकरचं नाव येतं. आजवर तिने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अभिनयाबरोबरच अमृता तिच्या दमदार नृत्यकलेसाठीही ओळखली जाते. तिला डान्सची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याच्या सोबतीने एका बहुचर्चित हिंदी रिअ‍ॅलिटी शोच्या विजेतेपदावर नाव कोरलंय.

अमृताचा नवरा हिमांशू मल्होत्रा हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. याशिवाय त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. जवळपास १० ते १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर अमृताने २०१५ मध्ये हिमांशूबरोबर लग्न केलं. त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. सध्या अमृता तिच्या कुटुंबीयांबरोबर लंडन फिरायला गेली आहे.

हेही वाचा : वाहतूक कोंडीत अडकले नम्रता संभेराव अन् प्रसाद खांडेकर; पोस्ट शेअर करत म्हणाले, “मुंबई असो वा गंगटोक…”

अमृता खानविलकरने लंडन ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोवर तिच्या चाहतीने नवऱ्याबद्दलचा प्रश्न विचारला आहे. “हिमांशूबरोबर तू का फिरत नाहीस? आम्ही तुम्हाला एकत्र फिरताना खूप कमी वेळा पाहतो. नेहमी तू तुझी आई किंवा बहिणीबरोबर फिरायला जाते पण, हिमांशू कुठेच नसतो” अशी कमेंट या युजरने अमृताच्या फोटोवर केली आहे.

हेही वाचा : आधी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, नंतर ओटीटी रिलीजसाठी घेतले कोट्यवधी; तुम्ही पाहिलेत का ‘हे’ बॉकबस्टर दाक्षिणात्य चित्रपट

संबंधित युजरला अमृताने सुद्धा अगदी स्पष्ट उत्तर देत स्वत:ची बाजू मांडली आहे. अभिनेत्री म्हणते, “खरं सांगायचं झालं, तर हिमांशू साधं इन्स्टाग्राम सुद्धा वापरत नाही. त्याचं अकाऊंट आहे पण, तो त्याठिकाणी स्वत:बद्दल काहीच शेअर करत नाही, कोणालाच फॉलो करत नाही. त्यामुळे एकत्र फोटो टाकायचा प्रश्नच येत नाही. यापलीकडे जाऊन आमच्या आयुष्यातील काही गोष्टी हिमांशू आणि मला प्रायव्हेट ठेवायला आवडतात.”

हेही वाचा : २५ दिवसांनी घरी परतलेल्या गुरुचरण सिंगचा बदललाय लूक, ओळखणंही झालं कठीण; पाहा पोलिसांबरोबरचा पहिला फोटो

अमृता खानविलकरचं चाहतीला उत्तर

दरम्यान, यापूर्वी सुद्धा अनेकदा अमृता खानविलकरने हिमांशूबरोबर फोटो न टाकण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. आता पुन्हा एकदा चाहतीसमोर अभिनेत्रीने तिची बाजू स्पष्ट केली आहे. याशिवाय अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, येत्या काळात ती ‘पठ्ठे बापूराव’ आणि ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.