संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरीजमध्ये ब्रिटिश अधिकारी कार्टराईटची भूमिका अभिनेता जेसन शाह याने केली होती. या सीरिजमधील अभिनयासाठी जेसन शाहचं खूप कौतुक झालं. जेसनने मराठमोळी अभिनेत्री अनुषा दांडेकरला डेट केलं होतं. सीरिजनिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने अनुषाशी ब्रेकअप का झालं, याचं कारण सांगितलं होतं. जेसनच्या त्या विधानावर आता अनुषाने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेसन शाह काय म्हणाला होता?

“समोरची व्यक्ती (अनुषा) मला खरोखरच समजून घेऊ शकली नाही आणि मला वाटलं की ती मला एका ठराविक बॉक्समध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत होती. पण तसं होऊ शकत नाही ना?” असं जेसनने म्हटलं होतं.

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

“कधीकधी आपले विचार योग्य प्रकारे मांडू न शकल्यामुळेही नाती तुटतात. मला वाटतं की आमच्या बाबतीतही असंच घडलं. आम्ही एकमेकांशी नीट बोलू शकत नव्हतो आणि त्यामुळे आमच्यातील गैरसमज वाढले. मला वाटतं ती मला समजू शकली नाही आणि नंतर आम्ही वेगळे झालो,” असं जेसन म्हणाला होता.

ब्रेकअपनंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वात कोणते बदल झाले, याबाबत जेसनने सांगितलं. “ब्रेकअपनंतर माझ्यात अनेक बदल झाले. माझा कल अध्यात्माकडे वाढला आहे. मी आता गोष्टी चांगल्या प्रकारे पाहू आणि समजू शकतो,” असं जेसनने म्हटलं होतं.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

अनुषा दांडेकरची प्रतिक्रिया

अनुषाला बिग बॉस ओटीटी ३ ची ऑफर आल्याच्या चर्चा होत आहेत. त्याचेच स्क्रीन शॉट्स अनुषाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आणि लिहिलं, “आता या क्षणी जर तुम्ही माझं नाव गुगल केलं, तर सर्वात आधी दिसेल की मी एखाद्याला ठराविक बॉक्समध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत आहे, हे खोटं आहे आणि आता हे दुसरं खोटं! मी कोणाशीच बातचीत केलेली नाही आणि ते मला या शोसाठी कधीच कॉलही करणार नाहीत कारण त्यांना माझं उत्तर माहित आहे.”

‘हॅलो छायाजी, मैं…’, जेव्हा कोकणात असलेल्या छाया कदमांना तब्बूने केला होता फोन

ती पुढे म्हणाली, “मला चांगलं वाटतंय की प्रत्येकाला माझं नाव वापरायचं आहे. मला वाटतं की मी खूश व्हायला पाहिजे, पण काय होईल जर तुम्ही सगळेच थोडं तरी खरं बोलू लागाल?”

अनुषा दांडेकरची स्टोरी

अनुषा दांडेकरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘जुनं फर्निचर’ या मराठी चित्रपटात झळकली. यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, भूषण प्रधान या कलाकारांच्या भूमिका आहेत. यात भूषण व अनुषाची जोडी प्रेक्षकांना खूप भावली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anusha dandekar reacts on ex boyfriend jason shah claim that she tried to fit him in box hrc