‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल सुरू आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर त्यांची लेक सना शिंदेने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने या चित्रपटाची संपूर्ण टीम विविध ठिकाणांना भेट देत आहे. पण या सर्वांबरोबर सना कुठेच दिसली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदर्शनाच्या आधी अनेक दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. तर त्यानंतरही केदार शिंदे आणि या चित्रपटातील कलाकार अनेक मुलाखती देताना दिसत आहेत. या मुलाखतींदरम्यान चित्रपटातील अभिनेत्रींनी सनाचंही भरभरून कौतुक केलं. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच सना कुठेही दिसली नाही. ती कुठे गेली असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण सना या चित्रपटाबद्दलच्या कोणत्याही कार्यक्रमात न दिसण्याचं एक खास कारण आहे.

आणखी वाचा : Baipan Bhari Deva collection: १० दिवसांत ‘बाईपण भारी देवा’ची ऐतिहासिक कमाई, केदार शिंदे म्हणाले, “काही घटना…”

केदार शिंदे यांची लेक सना शिंदे हिने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला. त्या चित्रपटामुळे तिचा चाहतावर्गही वाढला. तर त्यानंतर ‘बाईपण भारी देवा’साठी सना शिंदेने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं असल्याने प्रेक्षक तिचंही कौतुक करत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ती ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमामध्ये दिसली नाही. त्याचं कारण म्हणजे ती अमेरिकेला गेली आहे. ती अमेरिकेला का गेली आहे याचं कारण अजून समोर आलं नसलं तरीही सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या या अमेरिकेच्या ट्रीपचे फोटो चाहत्यांची शेअर करत आहे.

हेही वाचा : अमृता खानविलकरने केदार शिंदेंच्या लेकीसाठी पाठवली खास भेट, फोटो पोस्ट करत सना म्हणाली…

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये २६.१९ कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva getting success but kedar shinde daughter sana shinde is in america know the reason rnv