Bhushan Pradhan And Anusha Dandekar : यंदाचं वर्ष अभिनेता भूषण प्रधानसाठी खूपच खास ठरलं. कारण, यावर्षी त्याने ‘जुनं फर्निचर’ आणि ‘घरत गणपती’ या दोन्ही गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्याचं पाहायला मिळालं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच भूषणने त्याचा ३८ वा वर्ष वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान अभिनेत्री अनुषा दांडेकरने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांपासून भूषण प्रधान ( Bhushan Pradhan ) आणि अनुषा दांडेकर यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. यामुळे त्यांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत भूषण-अनुषाने अनेक पार्ट्यांना एकत्र उपस्थिती लावली होती. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. अशातच भूषणच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अनुषाने याबरोबर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : लाडक्या लेकीला रणबीरने पहिल्यांदा ऐकवलं होतं ६५ वर्षांपूर्वीचं ‘हे’ जुनं गाणं! भर कार्यक्रमात खुलासा, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री भूषणला ( Bhushan Pradhan ) शुभेच्छा देताना लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भुशी! येणारं प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी अविश्वसनीय आणि भरभराटीचं ठरो. तू खूप जास्त हुशार आहेस आणि आता तुझ्या हुशारीची झलक संपूर्ण जगाने पाहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला नेहमी आनंदी ठेवल्याबद्दल थँक्यू, मला छोट्या-छोट्या गोष्टी सरप्राइज म्हणून दिल्याबद्दल थँक्यू. तुझं मन खरंच खूप मोठं आहे. एक सच्चा माणूस, चांगला मुलगा, भाऊ, एक खूप छान मित्र आणि तुझ्यातल्या याच गोष्टी मला खूप आवडतात. तू सर्वांवर मनापासून प्रेम करतोस. आपले स्वभाव एकदम जुळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा स्वभाव खूप खरा आहे… हा खरेपणा कायम जपून ठेव. मी तुला फक्त वर्षभर ओळखतेय पण, आता हे वर्ष शंभर वर्षांइतकं वाटतंय… ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना? लव्ह यू! भूषण प्रधान”

हेही वाचा : मलायका अरोरानंतर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप; म्हणाली, “इतकी वर्षे झाली, मी…”

भूषण प्रधान व अनुषा दांडेकर ( Bhushan Pradhan And Anusha Dandekar )

अनुषाने या पोस्टबरोबर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हे दोघंही विविध ठिकाणी फिरून आल्याचं पाहायला मिळत आहे. या पोस्टवर सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “लवकर लग्न करा”, “तुम्ही दोघंही एकत्र खूप छान दिसता लग्न करा”, “परफेक्ट आणि मेड फॉर इच अदर”, “सुंदर जोडी”, “हे दोघंही डेट करत आहेत का”, “दोघांचं जमलंय का”, “तुम्ही दोघंही एकत्र छान दिसता” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhushan pradhan and anusha dandekar dating rumors actress shares birthday post with romantic caption sva 00