पुढच्या आठवड्यात गणपती येणार म्हणून सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. अनेक मराठी कलाकार देखील त्यांच्या घरच्या गणपतीच्या आगमनाच्या तयारीला लागली आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेता भूषण प्रधान. आता दरवर्षी ते गणपती कसा साजरा करतात हे त्याने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यांच्या घरच्या बाप्पाची मूर्ती आणि त्यांनी केलेली सजावट नेहमीच लक्ष वेधून घेत असते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ते साजरा करतात. इतकंच नाही तर बाप्पाची मूर्ती देखील ते घरीच बनवतात. आता या सगळ्याबद्दल भूषणने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “ते खूप…”, भूषण प्रधानने उलगडला महेश मांजरेकरांचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत भूषण म्हणाला, “बाप्पा हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे. मुंबईत घर घेतल्यापासून म्हणजेच गेल्या आठ वर्षांपासून आमच्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो. त्या वर्षी एक वेगळाच उत्साह होता. घरी शाडूची माती आणली आणि त्यातून आईने पहिल्यांदा गणपतीची मूर्ती बनवली. तेव्हापासून आम्ही घरीच गणपतीची मूर्ती बनवतो. तर त्याचं विसर्जनही घरीच करतो. मुंबईतल्या घराच्या बाहेरील पॅसेजमध्ये अतिशय पर्यावरणपूरक पद्धतीने आम्ही विसर्जन करतो.”

हेही वाचा : भूषण प्रधान की वैभव तत्त्ववादी? पूजा सावंत नक्की कोणाला करतेय डेट? अखेर अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली…

पुढे तो म्हणाला, “तर आता यंदाच्या गणपतीची मूर्ती ही बनवायला सुरुवात झाली आहे. मीही माझ्या शूटिंगमधून वेळ मिळेल तसा आईला मूर्ती बनवायला मदत करतो. खरंतर मी तिच्या य कामात लुडबुडच करतो. मी गणपतीची मूर्ती रंगवणार असा माझा दरवर्षी हट्ट असतो. त्याशिवाय गणपतीची आरासही पर्यावरणपूरकच करण्यावर माझा भर असतो.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhushan pradhan opens up about how they celebrate ganpati festival and make idol at home rnv