मराठी कलाविश्वात मानाचा समजला जाणाऱ्या फिल्मफेअरने फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२५ च्या १०व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. या सोहळ्यासोबतच, मराठी सिनेमातील उत्कृष्ट प्रतिभेचा सन्मान करण्याच्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या या रोमांचक प्रवासाचे एक दशक पूर्ण होत आहे. टाइम्स ग्रुपद्वारे आयोजित केलेली ही संध्याकाळ मराठी सिनेमाच्या गौरवाचे, दमदार मनोरंजनाचे आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार ठरणार आहे.

मुंबईत पार पडणार सोहळा

१० जुलै २०२५ रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात, १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना आणि उत्कृष्ट कलाकृतींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये ‘पाणी’ हा चित्रपट तब्बल १८ नामांकनांसह आघाडीवर आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता यांसारख्या प्रमुख श्रेणींमध्ये नामांकन मिळालं आहे. त्यापाठोपाठ ‘फुलवंती’ चित्रपट १६ नामांकनांसह शर्यतीत आहे. या चित्रपटातून प्राजक्ता माळी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ‘घरत गणपती’ हा चित्रपटही १२ नामांकनांसह या स्पर्धेत आपलं स्थान निर्माण करत आहे.

यंदाच्या फिल्मफेअर मराठी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीमध्ये खालील चित्रपटांना नामांकन मिळालं आहे:

• पाणी

• घरत गणपती

• जुनं फर्निचर

• नाच गा घुमा

• धर्मवीर 2

• फुलवंती

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आदिनाथ एम. कोठारे यांना विविध भूमिकांसाठी नामांकन मिळालं आहे. त्यांना ‘पाणी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉइस) या श्रेणींमध्ये नामांकन मिळालं आहे. मुख्य आणि समीक्षकांची पसंती अशा दोन्ही श्रेणींमध्ये त्यांची निवड झाली आहे, हे विशेष.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची स्पर्धा चर्चेत

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील स्पर्धा यंदा अधिक रंजक आणि चुरशीची आहे. या श्रेणीत मुक्ता बर्वे (‘नाच गं घुमा’), सई ताम्हणकर (‘श्रीदेवी प्रसन्न’), आणि प्राजक्ता माळी (‘फुलवंती’) यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने नामांकन मिळवलं आहे. याव्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स चॉइस) पुरस्कारासाठी पल्लवी परांजपे, रोहिणी हट्टंगडी आणि रुचा वैद्य यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. या भव्य संध्याकाळचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर हे दमदार जोडगोळी करणार आहे. त्यांच्या उत्साही आणि सहजसुंदर जुळलेल्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहील, यात शंका नाही. ग्लॅमर आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेल्या या संध्याकाळकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रतिष्ठेची ‘ब्लॅक लेडी’ अर्थात ट्रॉफी कोण घरी घेऊन जातं, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

वर्ल्डवाइड मीडियाचे संचालक आणि ZEEL, BCCL TV अँड डिजिटल नेटवर्कचे CEO रोहित गोपाकुमार यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “आम्ही फिल्मफेअर अवॉर्ड मराठीच्या 10व्या आवृत्तीचा वर्ष साजर करत आहोत आणि मला हे सांगताना आनंद होत आहे की, हा प्रवास खूप महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटतोय. सिनेमा क्षेत्रातील उत्कृष्ट कामाचा गौरव करण्यासाठी आम्ही या पुरस्काराची सुरुवात केली होती आणि आता ही एक सांस्कृतिक संस्था म्हणून काम करत आहे. ही संस्था मराठी सिनेमा क्षेत्रात नव्या प्रतिभेला प्रकाशझोतात आणत आहे. गेल्या दशकात, प्रत्येक आवृत्तीसोबत आमचे कलाकार आणि प्रेक्षकांशी असलेले नाते आणखी घट्ट आणि मजबूत झाले आहे. प्रत्येक आवृत्तीने कलाकार आणि प्रेक्षकांशी आमचं नातं अधिक घट्ट केलं आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्म्याचं प्रतिबिंब असलेल्या कथांमधून हे नातं अधिक दृढ झालं. आमच्या भागीदारांच्या सततच्या पाठिंब्याने, आम्ही मराठी सिनेमाचा वारसा जपण्यासाठी आणि त्याच्या भविष्याला दिशा देण्यासाठी सातत्याने काम करत राहू.”

फिल्मफेअरचे एडिटर-इन-चीफ जितेश पिल्लई यांनी या सोहळ्याबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले, “फिल्मफेअरमध्ये आम्ही नेहमीच प्रेक्षकांना भावणाऱ्या कथांचे कौतुक करतो, आणि जसा इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलत आहे, तसा उत्कृष्ट प्रतिभेचा सन्मान करण्याचे आमचे काम अधिक महत्त्वाचे ठरते. फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी ही त्या महान कलाकारांना समर्पित आहे, जे प्रत्येक फ्रेममध्ये जीव ओतून सिनेमा घडवतात. इंडस्ट्रीला आकार देणाऱ्या कला, कौशल्य आणि भावनांच्या सन्मानाशी संबंधित ही 10 वी आवृत्ती आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि या वर्षीच्या शानदार नामांकनांना सर्वांसमोर सादर करताना आम्ही खूप उत्साहित आणि रोमांचित आहोत.”

सर्वोत्कृष्ट चित्रपट

धर्मवीर 2
घरत गणपती
जुनं फर्निचर
नाच गं घुमा
पाणी
फुलवंती

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

आदिनाथ एम. कोठारे – पाणी
महेश मांजरेकर – जुनं फर्निचर
नवज्योत बांदिवडेकर – घरत गणपती
परेश मोकाशी – नाच गं घुमा
प्रवीण तरडे – धर्मवीर 2
वरुण नार्वेकर – एक दोन तीन चार

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)

आता वेळ झाली (अनंत महादेवन)
अमलताश (सुहास देसले)
घाठ (छत्रपाल आनंद निनावे)
खडमोड (राहुल रामचंद्र पवार)
पाणी (आदिनाथ एम. कोठारे)
सत्यशोधक (निलेश जळमकर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका – पुरुष)

आदिनाथ एम. कोठारे (पाणी)
गश्मीर महाजनी (फुलवंती)
महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
नाना पाटेकर (ओले आले)
प्रसाद ओक (धर्मवीर २)
सिद्धार्थ चांदेकर (श्रीदेवी प्रसन्न)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)

आदिनाथ एम. कोठारे (पाणी)
दिलीप प्रभावळकर (आता वेळ झाली)
जितेंद्र जोशी (घाठ)
मेघराज मल्लिनाथ कळशेट्टी (खडमोड)
राहुल देशपांडे (अमलताश)
सुनील बर्वे (स्वरगंधर्व सुधीर फडके)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका – स्त्री)

मुक्ता बर्वे (नाच गं घुमा)
प्राजक्ता माळी (फुलवंती)
प्रियदर्शिनी इंदलकर (नवरदेव BSC AGRI)
सई ताम्हणकर (श्रीदेवी प्रसन्न)
सोनाली खरे (मायलेक)
वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)

पल्लवी परांजपे (अमलताश)
राजश्री देशपांडे (सत्यशोधक)
रोहिणी हट्टंगडी (आता वेळ झाली)
रुचा वैद्य (पाणी)
सुरुची अडारकर (घात)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)

अशोक सराफ (नवरा माझा नवसाचा २)
कै. अतुल परचुरे (अलिबाबा आणि चाळीशीतले चोर)
दिलीप प्रभावळकर (पंचक)
हरीश दुधाडे (नवरा माझा नवसाचा २)
क्षितिश दाते (धर्मवीर २)
मिलिंद शिंदे (घात)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (स्त्री)

अश्विनी भावे (घरत गणपती)
मृणाल कुलकर्णी (एक दोन तीन चार)
नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
नंदिता पाटकर (पंचक)
निर्मिती सावंत (नवरा माझा नवसाचा २)
सुलभा आर्या (श्रीदेवी प्रसन्न)

सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम

अमितराज (श्रीदेवी प्रसन्न)
अविनाश-विश्वजीत (फुलवंती)
भूषण माटे (अमलताश)
गुलराज सिंग (पाणी)
संकेत साने (घरत गणपती)
तन्मय भिडे (नाच गं घुमा)

सर्वोत्कृष्ट गीत

डॉ. प्रसाद बिवारे (मदनमंजिरी – फुलवंती)
कै. शांता शेळके (सरले सारे – अमलताश)
मंदार चोळकर (अंगाई गाणे – ओले आले)
मंदार चोळकर (फुलपाखरू – ओले आले)
मनोज यादव (नाचणारा – पाणी)
वैभव जोशी (काय चुकले सांग ना – जुनं फर्निचर)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)

अभय जोधपुरकर (नवसाची गौरी माझी – घरत गणपती)
आदर्श शिंदे (नाचणारा – पाणी)
अवधूत गुप्ते (झगमगा – ओले आले)
राहुल देशपांडे (हे शारदे – फुलवंती)
राहुल देशपांडे (सरले सारे – अमलताश)
शंकर महादेवन (टायटल ट्रॅक – पाणी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (स्त्री)

आर्या आंबेकर (फुलवंती टायटल ट्रॅक – फुलवंती)
सायली खरे (वासराची आई – घरत गणपती)
प्रियांका बर्वे (मृगतृष्णा – ही अनोखी गाठ)
शाल्मली खोलगडे (साला कॅरेक्टर – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर)
वैशाली माडे (मदनमंजिरी – फुलवंती)
वैशाली सामंत (नाच गं घुमा टायटल ट्रॅक – नाच गं घुमा)

सर्वोत्कृष्ट कथा

अदिती मोघे (श्रीदेवी प्रसन्न)
आलोक सुतार आणि नवज्योत बांदिवडेकर (घरत गणपती)
छत्रपाल आनंद निनावे (घात)
महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सुहास देसले आणि मयुरेश वाघ (अमलताश)
विपुल मेहता (ओले आले)

सर्वोत्कृष्ट पटकथा

अदिती मोघे (श्रीदेवी प्रसन्न)
छत्रपाल आनंद निनावे (घात)
महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
नितीन दीक्षित (पाणी)
स्नेहल प्रवीण तारडे (फुलवंती)
वरुण नार्वेकर आणि निपुण धर्माधिकारी (एक दोन तीन चार)

सर्वोत्कृष्ट संवाद

अदिती मोघे (श्रीदेवी प्रसन्न)
छत्रपाल आनंद निनावे आणि विकास मुडकी (घात)
मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी (नाच गं घुमा)
महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
नितीन दीक्षित (पाणी)
प्रवीण विठ्ठल तरडे (फुलवंती)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत

अमोल धाडफळे, योहान मॅथ्यू आणि भूषण माटे (अमलताश)
अविनाश-विश्वजीत (धर्मवीर २)
अविनाश-विश्वजीत (फुलवंती)
गुलराज सिंग (पाणी)
हितेश मोदक (जुनं फर्निचर)

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन

अनमोल भावे (पाणी)
मानस माळी (अमलताश)
मनोज एम गोस्वामी (घात)
प्रणाम पानसरे (फुलवंती)
रोहित चंद्रप्रभा (खडमोड)
शांतनू आकेरकर आणि दिनेश उचील (ओले आले)
शिरीष चौसाळकर (नाच गं घुमा)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण

अजित रेड्डी (जुनं फर्निचर)
अर्जुन सोरटे (पाणी)
गुलाम एन. एस. (ओले आले)
महेश लिमये (फुलवंती)
राहुल रामचंद्र पवार, गुरुराज बक्षी आणि अक्षय इंगळे (खडमोड)
शेली शर्मा आणि प्रसाद भेंडे (घरत गणपती)
उदित खुराणा (घात)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन

मंगेश भायडे आणि ऋषी तांबे (अमलताश)
डॉ. सुमित पाटील (घरात गणपती)
एकनाथ कदम (फुलवंती)
प्रशांत बिडकर (पाणी)
संपदा गेज्जी (एक दोन तीन चार)
विजय महामुळकर (धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज)

सर्वोत्कृष्ट ए़डिटिंग

आशिष म्हात्रे (घरात गणपती)
जितेंद्र के. शाह (ओले आले)
मयूर हरदास आणि आदिनाथ एम. कोठारे (पाणी)
नवनीता सेन (घात)
राहुल भातणकर (जुनं फर्निचर)
सुहास देसले (अमलताश)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा

अपर्णा सुर्वे-गुरम आणि महेश शेरला (घरात गणपती)
गणेश लोणारे (धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज)
मानसी अत्तार्डे (फुलवंती)
रश्मी सावंत आणि मानसी अत्तार्डे (धर्मवीर २)
सचिन लवलेकर (स्वरगंधर्व सुधीर फडके)
स्नेहा निकम (श्रीदेवी प्रसन्न)

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक

आदिनाथ एम. कोठारे (पाणी)
छत्रपाल आनंद निनावे (घात)
राहुल रामचंद्र पवार (खडमोड)
नवज्योत बांदिवडेकर (घरात गणपती)
स्नेहल प्रवीण तारडे (फुलवंती)
सुहास देसले (अमलताश)
विशाल मोडभावे (श्रीदेवी प्रसन्न)