जॅकी श्रॉफ हे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आहे. सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्पा अनुभवणाऱ्या ६७ वर्षीय जॅकी यांनी अनेक सिनेमांत उत्तम अभिनय केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी ‘सिंघम अगेन’ आणि ‘बेबी जॉन’ या दोन्ही चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. २०२५ ची सुरुवात त्यांनी ‘चिडीया उड’ या वेब सीरिज मधील आणखी एका नकारात्मक भूमिका केली. आणि आता, जॅकी फक्त बॉलीवूड किंवा दक्षिणेतच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतही काम करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर्षी जॅकी श्रॉफ यांचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असून, ते तब्बल दहा वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत! ‘न्यूज १८’ ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. “जॅकी सरांचा शेवटचा मराठी चित्रपट ‘शेगावीचा योगी गजानन’ २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, २०२४ मध्ये त्यांना एका वेगळ्या धाटणीच्या स्क्रिप्टची ऑफर मिळाली, ही स्क्रिप्ट त्यांना खूप आवडली. त्यांनी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे आणि आता प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत,” अशी माहिती एका सूत्राने दिली.

या प्रोजेक्टबद्दल आणखी माहिती देताना, सूत्राने सांगितले, “हा एक साय-फाय हॉरर चित्रपट आहे. या जॉनरमुळेच जॅकी सरांना हा चित्रपट करण्याची इच्छा झाली. या चित्रपटात शरद केळकर यांचीही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग पुणे आणि आजूबाजूच्या भागात झालं आहे.” यापूर्वी जॅकी आणि शरद यांनी २००४ च्या ‘हलचल’ या विनोदी चित्रपटात एकत्र काम केले होते. गेल्या वर्षी जॅकी यांनी शरदच्या मराठी अॅक्शन चित्रपट ‘रानटी’चा टीझर सोशल मीडियावर शेअर करत त्याला पाठिंबा दिला होता.

त्याच अनुषंगाने, गेल्या काही वर्षांत जॅकी सोशल मीडियावर मोठे संवेदनशील व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांच्या रेसिपीज, पापाराझींबरोबरच्या गप्पा आणि ‘झाड लाव’ (पेड लगा) या मीम्समुळे त्यांची लोकप्रियता टिकून आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jackie shroff returns to marathi cinema after a decade psg