मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटातून तिनं काम केलं आहे. अभिनयाबरोबर क्रांती आता दिग्दर्शनही करत आहे. अशी ही सर्वगुण संपन्न असलेली अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. काल दोघींचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने क्रांतीने खास पोस्ट शेअर केली होती; जी चांगलीच व्हायरल झाली होती. आता क्रांतीने मुलींचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री क्रांती रेडकरने काही तासांपूर्वी मुलींचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये क्रांती सांगतेय की, “रात्रीचा १ वाजत आलाय. बर्थडे पार्टी संपली आहे. पण आमची दोन माणसं रिटर्न गिफ्ट असलेला कराओके माईक घेऊन गाणं गात आहेत. मस्त हलून वगैरे ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं गात आहेत.” क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिच्या दोन मुली कराओके माईक घेऊन गाणं गाताना दिसत आहेत.

हेही वाचा – माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी मुलांना दिलाय ‘हा’ कानमंत्र, अभिनेत्री म्हणाली, “आम्ही त्यांना…”

क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेहमीप्रमाणे तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आपल्या भावी गायिका आहेत त्या, रंगीत तालीम सुरू आहे”, “अगं असूदेत गं, एन्जॉय करू देत, तू झोप तुझ तू”, “किती गोड”, “तुम्ही युट्यूबवर व्लॉग का करत नाही? कारण तुमचे रील मनोरंजक असतात”, अशा अनेक प्रतिक्रिया क्रांतीच्या व्हिडीओवर उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमध्ये प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायच्या एक्स गर्लफ्रेंडची दमदार एन्ट्री, कोण आहे ती जाणून घ्या

दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती काही महिन्यांपूर्वी ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसली होती. लवकरच तिने दिग्दर्शित केलेला दुसरा ‘रेनबो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar twin daughters sing amchya papani ganpati anala song video goes viral pps