scorecardresearch

Premium

Video: हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमध्ये प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायच्या एक्स गर्लफ्रेंडची दमदार एन्ट्री, कोण आहे ती जाणून घ्या

‘जाऊ बाई गावात’च्या घरात कोणा-कोणाची एन्ट्री झाली पाहा…

Emiway Bantai Ex Girlfriend Mukkta Karandikar entry in hardeek joshi Javu Bai Gavat show
'जाऊ बाई गावात'च्या घरात कोणा-कोणाची एन्ट्री झाली पाहा…

‘झी मराठी’ वाहिनीवर कालपासून (४ डिसेंबर) हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे. एक अफलातून संकल्पना असलेल्या या नवीन रिअ‍ॅलिटी शोमध्ये श्रीमंत आणि शहरात वाढलेल्या मुली गावरान आयुष्य जगू शकणार का? हे पाहायला मिळणार आहे. काल या शोमध्ये एकूण ११ स्पर्धक मुलींची निवड झाली. यामध्ये प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाय याच्या एक्स गर्लफ्रेंडचा देखील सहभाग आहे.

‘जाऊ बाई गावात’चा काल पहिला भाग प्रसारित झाला. यामध्ये शोमधील स्पर्धक मुलींची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मतावरून ११ स्पर्धक मुलींना निवडण्यात आलं. यामध्ये पहिली स्पर्धक होती मुक्ता करंदीकर; जी रॅपर आणि गायिक आहे. हिच मुक्ता प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायची एक्स गर्लफ्रेंड आहे. दोघांचा काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर मुक्ता ‘एमटीव्ही’वरील ‘लव्ह स्कूल सीझन ४’मध्ये झळकली होती. आता तिची ‘जाऊ बाई गावात’च्या घरात दमदार एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ती या गावात करू शकेल का ही रॉक? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Bullet, Army Firing, Practice, Hits Kothrud Residence, bhusari colony, pune,
पुणे : लष्करी सरावादरम्यान कोथरुडमध्ये सदनिकेच्या खिडकीवर बंदुकीची गोळी
rbi
‘कर्ज-जीडीपी गुणोत्तरा’त ७३.४ टक्क्यांपर्यंत घसरण शक्य; नाणेनिधीच्या इशाऱ्याला धुडकावून लावणारा रिझर्व्ह बँकेच्या पत्रिकेत दावा
youth stunt running vehicle pimpri
पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!
dance drama based on shivaji maharaj life
कोल्हापुरात नृत्यनाट्य मधून शिवरायांचे प्रसंग साकारले; एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरची लगीनघाई! जेवणाचा मेनू ठरवताना गोखले-कोळी कुटुंबात पुन्हा पडली वादाची ठिणगी

हेही वाचा – Bigg Boss 17: मन्नारा चोप्राने अंकिता लोखंडेच्या तोंडावर फेकली कॉफी; नॉमिनेशनदरम्यान झाला हंगामा, पाहा नवा प्रोमो

दरम्यान, मुक्ता व्यतिरिक्त डॅशिंग लेडी डॉन स्नेहा भोसले, छोटा पॅकेट बडा धमाका अंकिता मेस्त्री, सुरेल संस्कारी गायक श्रेजा म्हात्रे, पापा की परी संस्कृती साळुंखे, फॅशन दिवा रसिका ढोबळे, आपल्या मनाची राणी असलेली वर्षा हेगडे, मॉडेल हेत पाखरे, अभिनेत्री, फोटोग्राफर वैष्णवी सावंत, रमशा फारुकी आणि मोनिशा आजगावकर या ११ स्पर्धक मुलींची ‘जाऊ बाई गावात’च्या घरात एन्ट्री झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Emiway bantai ex girlfriend mukkta karandikar entry in hardeek joshi javu bai gavat show pps

First published on: 05-12-2023 at 11:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×